Goa Government Jobs: गोमंतकीय तरुणांसाठी सुवर्णसंधी! 67 पदांची होणार भरती; कुठे कराल अर्ज? जाणून घ्या..

Goa Recruitment: पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी १० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. त्यानंतर निवडक उमेदवारांना लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीसाठी बोलावण्यात येणार आहे.
Goa Government Jobs
Goa Government JobsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ‘मुख्यमंत्री समुपदेशन’ योजनेअंतर्गत गोव्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये कंत्राटी तत्त्वावर समुपदेशकांची नियुक्ती करण्यासाठी गोवा शिक्षण विकास महामंडळाने (जीईडीसी) ६५ समुपदेशक आणि २ पर्यवेक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी १० एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. त्यानंतर निवडक उमेदवारांना लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीसाठी बोलावण्यात येणार आहे, असे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.

Goa Government Jobs
Jobs In Goa: महत्वाची बातमी! 8वी ते 10वी शिक्षित युवकांसाठी गोवा सरकारची नोकरीची हमी; राबवणार कौशल्य विकास प्रशिक्षण योजना

समुपदेशक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मानसशास्त्र किंवा समाजकार्य या विषयांतील पदव्युत्तर पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित क्षेत्रातील अनुभव आणि कोकणी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी वयोमर्यादा ४५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज महामंडळाच्या आल्त-पर्वरी येथील कार्यालयात सादर करावेत, असे महामंडळाने नमूद केले आहे.

Goa Government Jobs
Job Scam: नोकरीचं आमिष, अन् लाखो रुपयांचा गंडा; शांतीनगर येथील तरुणाची महिलेकडून फसवणूक, पोलिसांत तक्रार दाखल

असा असेल पगार

समुपदेशक पदासाठी दरमहा ३० हजार रुपये तर पर्यवेक्षक पदासाठी दरमहा ३५ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. या नियुक्त्या पूर्णपणे कंत्राटी स्वरूपाच्या असून त्यांचा कालावधी ११ महिन्यांचा असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com