Tiger Spotted In Goa: हरमल परिसरात फिरतोय 'पट्टेरी वाघ'? सोशल मीडियावर फोटो होतोय Viral; दुचाकी चालकाला दिसल्याचा दावा

Tiger spotted near arambol goa: पट्टेरी वाघ दुर्मीळ झालेले असताना हरमल- देऊळवाडा येथील रवळनाथ मंदिर ते मिठागर परिसरात पट्टेरी वाघाचे दर्शन घडले असल्‍याचा दावा होत आहे.
Tiger spotted near arambol goa
Tiger spotted near arambol goaDainik Gomantak
Published on
Updated on

हरमल: पट्टेरी वाघ दुर्मीळ झालेले असताना हरमल- देऊळवाडा येथील रवळनाथ मंदिर ते मिठागर परिसरात पट्टेरी वाघाचे दर्शन घडले असल्‍याचा दावा होत आहे. शनिवारी पहाटे एका दुचाकी चालकाला या वाघाचे दर्शन घडले व त्‍यामुळे त्‍याची घाबरगुंडी उडाली, अशी माहिती समोर आली आहे. पट्टेरी वाघाचा फोटो सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे.

देऊळवाडा भागात पाण्याचे स्रोत असल्याने हा वाघ जंगलातून कदाचित पाण्यासाठी खाली उतरला असण्याची शक्यता स्‍थानिकांनी व्यक्त केली आहे. वन खात्याने या संदर्भात स्‍पष्‍टता द्यावी तसेच योग्‍य बंदोबस्त करावा, अशी मागणीही होत आहे.

Tiger spotted near arambol goa
Tiger Reserve Goa: व्‍याघ्र प्रकल्‍पाबाबत होणाऱ्या सुनावण्‍यांवर 1 कोटीपेक्षा अधिक खर्च, वनमंत्री राणेंनी दिली माहिती

राज्‍यात पट्टेरी वाघांची स्थिती आजही नाजूक मानली जाते. अलीकडील व्‍याघ्र गणनेनुसार गोव्‍यातील वाघांची संख्‍या कमी झाली आहे. अलीकडच्या काळात बिबटे नागरी वस्‍तीकडे येत असून, त्‍यांची दहशत वाढली असतानाच हरमलात पट्टेरी वाघाच्‍या अधिवासासंदर्भात दावा झाल्‍याने लोकांमध्‍ये वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

Tiger spotted near arambol goa
Goa Tiger Reserve: गोव्यातील नेत्यांनी वाघांचे अस्तित्व नाकारणे, ही हाराकिरी आहे..

जंगलांचे प्रमाण कमी होणे, खाणकाम, विकासकामे आणि मानव-वन्यजीव संघर्ष ही व्‍याघ्र अधिवासासमोरील प्रमुख आव्हाने आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com