Rishabh Pant Second Date of Birth: भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत सध्या कार अपघातामुळे झालेल्या दुखापतींमधून सावरत आहे. पण याचदरम्यान 25 वर्षीय पंतने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने त्याच्या दुसऱ्या जन्माच्या तारखेचीही घोषणा केली आहे.
4 ऑक्टोबर 1997 रोजी जन्म झालेल्या पंतने बुधवारी (28 जून) त्याचा इंस्टाग्राम अकाउंटवरील बायो बदलला. यामध्ये त्याने त्याच्या पुर्नजन्माचीही तारिख टाकली आहे. त्याने 5 जानेवारी 2023 ही तारिख त्याच्या दुसऱ्या जन्माची तारिख असल्याचे त्याने यातून स्पष्ट केले.
खंरतर 30 डिसेंबर 2022 रोजी सकाळी दिल्लीवरून रुडकीला जात असताना अपघात झाला. त्याची कार नारसन बॉर्डरजवळ एका डिव्हायडरला धडकली. त्यामुळे हा अपघात झाला. दरम्यान, अपघातानंतर सुदैवाने पंत कारमधून बाहेर येण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. कारण या अपघातानंतर त्याच्या कारने पेट घेतला होता. त्यात त्याची कार पूर्णपणे जळाली.
या कार अपघातात पंतला डोक्याला, पाठिला, हाताच्या मनगटाला, घोट्याला दुखापती झाल्या आहेत. तसेच त्याच्या गुडघ्यात लिगामेंट टिअर्स झाले होते. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली.
दरम्यान, अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार या अपघातानंतर पंतला 5 जानेवारी 2023 रोजी पूर्ण शुद्ध आली होती. त्यामुळेच त्याने त्याचा पुर्नजन्म म्हणून ही तारिख इंस्टाग्राम बायोमध्ये टाकली आहे.
या अपघातानंतर पंतने तंदुरुस्त होण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यास सुरुवात केली. सध्या तो बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या तब्येतीत वेगाने सुधारणाही दिसत आहेत.
त्याने काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात तो कोणत्याही मदतीशिवाय आणि त्रासाशिवाय पायऱ्या चढू शकत होता.
दरम्यान, पंत पूर्ण तंदुरुस्त होण्यास अद्याप काही महिने जावे लागणार आहेत, त्यामुळे तो 5 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेत खेळण्याचीही शक्यता कमी आहे. त्यामुळे आता पंत पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन कधी करणार याची उत्सुकता त्याच्या अनेक चाहत्यांना असेल.
पंतने आत्तापर्यंत त्यांच्या कारकिर्दीत 33 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 43.67 च्या सरासरीने आणि 5 शतकांसह 2271 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 30 वनडे सामन्यांमध्ये 34.60 च्या सरासरीने 1 शतक आणि 5 अर्धशतकांसह 865 धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर त्याने 66 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 3 अर्धशतकांसह 987 धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने यष्टीरक्षण करताना 129 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 190 विकेट्स घेतल्या. यात 166 झेलांचा आणि 24 यष्टीचीतचा समावेश आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.