VIDEO: 'सिलिंडर पुरवठा झाला नाही तर हॉटेल बंद ठेवण्याची वेळ'! मर्यादित गॅसपुरवठा सुरू, व्‍यावसायिकांची तारेवरची कसरत

Goa Hotel Gas Shortage: आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याचा परिणाम मडगावातील हॉटेल व्यवसायावर दिसू लागला आहे.
LPG Gas Cylinder
LPG Gas CylinderDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याचा परिणाम मडगावातील हॉटेल व्यवसायावर दिसू लागला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा पुन्हा सुरू झाला असला तरी तो मर्यादित असल्याने अनेक हॉटेल्‍स व्यावसायिकांमध्ये अजूनही चिंतेचे वातावरण आहे.

अनेक हॉटेल्‍स व्यावसायिकांनी‍ आपल्या मेनूमधील काही खाद्यपदार्थ तात्पुरते बंद केले आहेत. परिस्थिती लवकर सुरळीत झाली नाही तर हॉटेल्‍स बंद ठेवण्याची वेळ येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांत व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता. त्यामुळे हॉटेल्‍स व्यावसायिक अडचणीत सापडले होते. दरम्यान, शनिवारी व रविवारी काही प्रमाणात सिलिंडरचा पुरवठा सुरू झाल्याने त्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

‘श्रद्धा क्लासिक’ हॉटेलच्या ज्योती नाईक यांनी सध्याची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले. पॉवर हाऊस परिसरातील ‘प्रीती उडुपी’ रेस्टॉरंटचे शंकर शेट्टी यांनी डोसा व स्पेशल चहा बंद केल्याचे सांगत लवकर सिलिंडर पुरवठा झाला नाही तर हॉटेल बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते, असे नमूद केले.

‘सिनेमोन’ रेस्टॉरंटचे साईश राजाध्यक्ष यांनी सध्या दोन-तीन दिवस तग धरता येईल, असे सांगितले. तर ‘तातो’ हॉटेलचे दिनेश धुरी यांनी रविवारी संपूर्ण दिवस हॉटेल बंद ठेवावे लागल्याचे सांगितले.

LPG Gas Cylinder
LPG Gas Cylnder: गोव्यात भीतीमुळे गॅसचे झपाट्याने 'बुकिंग'! एका दिवसात तब्बल 'इतक्या' सिलिंडरचे वितरण; किती साठा आहे शिल्लक? वाचा..

बड्डे येथील ‘दामोदर’ हॉटेलचे जीवोत्तम भट्ट यांनी शनिवारी व रविवारी सकाळी सिलिंडर मिळाल्याने काहीसा दिलासा मिळाल्याचे सांगितले. यापूर्वी डोसा पदार्थ बंद करावे लागले होते; मात्र परिस्थिती लवकर सुरळीत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

LPG Gas Cylinder
LPG Gas Cylinder: गॅस एजन्सींवर करडी नजर! काळाबाजार रोखण्यासाठी 53 कर्मचाऱ्यांची नियुक्ती; 25 दिवसांनीच होणार बुकिंग

काही ठिकाणी काय झालाय परिणाम?

साऊथ इंडियन थाळी बंद

स्पेशल चहा, डोसा बंद

काही हॉटेल्समध्ये मर्यादित मेनू

एका सिलिंडरवर दोन दिवस तग धरण्याची वेळ

स्‍थिती अशीच राहिली तर काही दिवसांत हॉटेल्‍स बंद करण्‍याची वेळ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com