Rishabh Pant: 'मी 13वा खेळाडू कारण...', पंतचा DCला भावुक संदेश, तर टीमकडूनही 'कॅप्टन'ला स्पेशल गिफ्ट

IPL 2023: क्रिकेटपासून दूर असलेला पंत दिल्ली कॅपिटल्सला पाठिंबा देताना दिसला असून संघानेही त्यांच्या कर्णधारासाठी खास कृत्य करत आठवण ठेवली आहे.
Rishabh Pant
Rishabh PantDainik Gomantak
Published on
Updated on

Delhi Capitals Heartwarming Gesture For Rishabh Pant: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील पहिला डबल हेडर (एका दिवसात दोन सामने) शनिवारी खेळला गेला. शनिवारचा दुसरा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. या सामन्यादरम्यान जवळपास सर्वांनाच ऋषभ पंतची आठवण झाली.

ऋषभ हा दिल्लीचा नियमित कर्णधार आहे. पण डिसेंबर 2022 च्या अखेरीस त्याचा दिल्लीवरून रुडकीला येताना गंभीर कार अपघात झाला. त्याला या अपघातात अनेक जखमाही झाल्या. तसेच त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्यामुळे पंत क्रिकेटपासून सध्या दूर आहे. तो जवळपास या संपूर्ण वर्षात क्रिकेटपासून दूर राहण्याचीच शक्यता आहे.

त्यामुळे सध्या आयपीएलमध्ये पंतच्या जागेवर डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे.

Rishabh Pant
IPL 2023: मुंबई-दिल्लीला मिळाले बुमराह-पंतसाठी बदली खेळाडू, 'हे' दोन क्रिकेटर्स घेणार जागा

संघापासून दूर असला तरी दिल्लीला पंतचा पाठिंबा

दरम्यान, संघापासून दूर असला तरी पंत दिल्लीला पाठिंबा देताना दिसला आहे. त्याने दिल्ली पहिला सामना खेळण्यापूर्वी एक ट्वीटही केले होते, जे सध्या चर्चेत आहे.

दिल्लीने चाहत्यांना पहिल्या सामन्यासाठी प्लइंग इलेव्हन सुचवण्यासाठी एक ट्वीट केले होते. त्या ट्वीटवर पंतने रिप्लाय करताना लिहिले की 'मी तुमचा 13 वा खेळाडू आहे, कारण इम्पॅक्ट प्लेअरचा नियम आला आहे; नाहीतर मी तुमचा 12 वा खेळाडू झालो असतो.'

आयपीएल 2023 मध्ये इम्पॅक्ट प्लेअरचा नियम लागू करण्यात आला आहे. इम्पॅक्ट प्लेअर हा संघाचा 12 वा खेळाडू आहे. इम्पॅक्ट प्लेअरचा नियम वापरून संघ गरज पडेल तेव्हा प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडूच्या जागी या 12 व्या खेळाडूला सामन्यात सामील करू शकतात. 

Rishabh Pant
Rishabh Pant: स्वत: ब्रश करण्यातदेखील आनंद मिळतो; अपघातानंतर ऋषभ पंत पहिल्यांदाच बोलला

दिल्लीनंही डगआऊटमध्ये केली पंतची एन्ट्री

दिल्लीनेही शनिवारी सामन्यादरम्यान संघाच्या डगआऊटमध्ये पंतच्या नावाची आणि त्याचा 17 हा जर्सी क्रमांक असलेली जर्सी अडकवली होती. या कृतीतून दिल्लीने सामन्यादरम्यान आपल्या कर्णधाराची आठवण ठेवली आहे.

दिल्लीने पंतसाठी केलेल्या या कृत्याचे सध्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. तसेच पंतची जर्सी दिल्लीच्या डगआऊटमध्ये अडकवलेली असतानाचा फोटोही सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, शनिवारी दिल्लीकडून पंतच्या जागेवर सर्फराज खानने यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडली. तसेच दिल्लीने या आयपीएल हंगामासाठी पंतचा बदली खेळाडू म्हणून अभिषेक पोरेलला संघात सामील केले आहे. यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या अभिषेकला दिल्लीने 20 लाखांच्या किमतीत संघात सामील केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com