Ponda By Election: फोंडा पोटनिवडणुकीची तारीख अखेर जाहीर! प्रचाराची रणधुमाळी वाढण्याची चिन्हे; 4 मे रोजी होणार मतमोजणी

Ponda By Election Date: इलेक्शन कमिशनने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार या मतदारसंघात ९ एप्रिल रोजी मतदान होणार असून मतमोजणी ४ मे रोजी करण्यात येणार आहे.
Ponda by election
Ponda by electionDainik Gomatnak
Published on
Updated on

गोव्यातील फोंडा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची तारीख अखेर जाहीर झाली आहे. इलेक्शन कमिशनने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार या मतदारसंघात ९ एप्रिल रोजी मतदान होणार असून मतमोजणी ४ मे रोजी करण्यात येणार आहे. या घोषणेनंतर मतदारसंघात आचारसंहिता लागू झाली आहे.

माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचे गेल्या वर्षी निधन झाल्यानंतर फोंडा विधानसभा जागा रिक्त झाली होती. त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीची घोषणा होण्याची प्रतीक्षा सुरू होती. १४ मार्च रोजी त्यांच्या निधनाला पाच महिने पूर्ण झाले असतानाही निवडणुकीची तारीख जाहीर झालेली नव्हती.

१४ एप्रिलला त्यांच्या निधनाला सहा महिने पूर्ण होणार असल्याने त्यापूर्वी मतदारसंघाला नवा आमदार मिळणे आवश्यक होते. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आधीपासून व्यक्त केली जात होती.

मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकनानंतर फोंडा मतदारसंघातील मतदारसंख्या घटल्याचेही समोर आले आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १६ मार्चपासून सुरू होणार आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २३ मार्च असून २६ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.

Ponda by election
Ponda By Election: फोंड्यात उमेदवारीसाठी 'आप'कडून दादाला गळ! अपक्ष लढण्याचे नाईक यांचे संकेत

या पोटनिवडणुकीसोबतच गुजरात, कर्नाटक, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांतील काही विधानसभा मतदारसंघांमध्येही मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, फोंडा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी भाजपाने दोन संभाव्य उमेदवारांची नावे अंतिम मान्यतेसाठी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठविल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली आहे. फोंड्यातून रितेश नाईक यांचे नाव चर्चेत असले तरी त्यांची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

Ponda by election
Ponda By Election: 'फोंड्यात कमळ फुलवणे हीच रवींना श्रद्धांजली'! दामू नाईकांचे प्रतिपादन; उमेदवार कोण? प्रश्नाला दिली बगल

दुसरीकडे, काँग्रेस पक्षाकडूनही तयारी सुरू झाली आहे. डॉ. केतन भाटीकर यांनी नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने या मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर पुढील काही दिवसांत प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवार जाहीर होण्याची शक्यता असून फोंडा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com