U19 World Cup | Team India X/ICC
क्रीडा

U19 World Cup: टॉस, पार्टनरशीप अन् कोलमडलेली फलंदाजी; भारताच्या फायनलमधील पराभवामागील 'ही' आहेत कारणे

U19 World Cup, India vs Australia Final: 19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्विकारावा लागला. यामागील कारणांचा घेतलेला आढावा.

Pranali Kodre

ICC U19 Men’s Cricket World Cup 2024 Final, India vs Australia:

रविवारी (11 फेब्रुवारी) 19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेते विजेतेपद ऑस्ट्रेलिया संघाने पटकावले. ऑस्ट्रेलियाने बेनेनीला झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ७९ धावांनी पराभूत करत चौथ्यांदा 19 वर्षांखालील वर्ल्डकपवर नाव कोरले.

दरम्यान, या संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या आणि तुफान फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाच्या अंतिम सामन्यातील पराभवाची काय कारणे आहेत, याचा घेतला आढावा.

नाणेफेक गमावणे

महत्त्वाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार उदय सहारनने नाणेफेक गमावली होती. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ह्यु वेबगेनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

गोलंदाजीला बऱ्यापैकी पोषक असलेल्या या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजीचा ऑस्ट्रेलियाचा निर्णय योग्य ठरला. सहारनने देखील नाणेफेक हरल्यानंतर म्हटले होते की जर त्याने नाणेफेक जिंकली असती, तरी फलंदाजी घेतली असती.

ऑस्ट्रेलियाकडून योग्यवेळी भागीदाऱ्या

या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली होती. मात्र ऑस्ट्रेलियाने योग्य वेळी भागीदाऱ्या करत संघाचा डाव वेळोवेळी सावरला.

ऑस्ट्रेलियाकडून पहिली विकेट तिसऱ्याच षटकात गेल्यानंतर हॅरी डिक्सन आणि कर्णधार ह्यू वेबगेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी केली.

ते दोघे बाद झाल्यावर हरजस सिंग आणि रायन हिक्स यांनी चौथ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला दिडशे धावांचा टप्पा पार करून दिला.

तसेच अखेरीस ऑलिव्हर पीकने तळातल्या फलंदाजांना साथीला घेत अखेरच्या 10 षटकात 66 धावा संघाला मिळवून दिल्या. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला 253 धावांपर्यंत पोहचला आले.

भारताने नियमित अंतराने गमावल्या विकेट्स

भारतीय संघाने 254 धावांचा पाठलाग करताना नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. ऑस्ट्रेलियाच्या महिल बिअर्डमनच्या वेगवान गोलंदाजीने मुशीर खान आणि उदय सहारन यांना बाद केल्यानंतर भारतीय संघाने कच खाल्ली. त्यातच उपांत्य फेरीतील हिरो सचिन धसला फिरकीपटू राफ मॅकमिलनने 9 धावांवरच माघारी पाठवलं.

भारताच्या फलंदाजीचा कणा ऑस्ट्रेलियाने मोडल्यानंतर मुरुगन अश्विनने एकाकी झुंज दिली, पण तोपर्यंत उशीर झाला होता. भारतीय संघाला वेळोवेळी भागीदाऱ्या रचता आल्या नाहीत, त्यामुळे अखेर भारताला 254 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यात अपयश आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT