U19 World Cup: फलंदाजीत भारताचं वर्चस्व, तर गोलंदाजीत मफाका चमकला; पाहा सर्वाधिक धावा अन् विकेट घेणारे टॉप-5 खेळाडू

Most Runs and Wickets in U19 WC: 19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे आणि विकेट घेणाऱ्या टॉप-5 खेळाडूंबद्दल जाणून घ्या.
Uday Saharan | Kwena Maphaka
Uday Saharan | Kwena MaphakaX/ICC
Published on
Updated on

ICC U19 Men’s Cricket World Cup 2024, Most Runs and Most Wickets:

रविवारी (11 फेब्रुवारी) भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांचे युवा क्रिकेट संघात १९ वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. दक्षिण आफ्रिकेतील बेनोनीमधील विलोमूर पार्क येथे झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने 79 धावांनी विजय मिळवत विश्वविजेतेपदावर नाव कोरले.

या अंतिम सामन्यानंतर या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंवर शिक्कामोर्तब झाले आहे. सर्वाधिक धावा करण्याचा मान भारताचा कर्णधार उदय सहारनने पटकावला, तर सर्वाधिक विकेट्स दक्षिण आफ्रिकेच्या क्वेना माफकाने घेतल्या.

Uday Saharan | Kwena Maphaka
U19 World Cup: ऑस्ट्रेलिया भारताचा पराभव करत चौथ्यांदा जगज्जेते! पाहा आत्तापर्यंतचे सर्व विजेते अन् उपविजेते संघ

सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या पाच खेळाडूंमध्ये तीन भारतीय खेळाडू आहेत. सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम उदय सहारनने केला असून त्याने 7 सामन्यांत 56.71 च्या सरासरीने 397 धावा केल्या. यात त्याच्या एका शतकाचा आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

या यादीत त्याच्यापाठोपाठ भारताचा मुशीर खान आहे. मुशीरने 2 शतकांसह 360 धावा केल्या.

19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

  • 397 धावा - उदय सहारन (भारत) (7 सामने)

  • 360 धावा - मुशीर खान (भारत) (7 सामने)

  • 309 धावा - हॅरी डिक्सन (ऑस्ट्रेलिया) (7 सामने)

  • 304 धावा - ह्यु वेबगेन (ऑस्ट्रेलिया)(7 सामने)

  • 303 धावा - सचिन धस (भारत) (7 सामने)

  • 287 धावा - लुआन-ड्रे प्रीटोरियस (दक्षिण आफ्रिका) (6 सामने)

Uday Saharan | Kwena Maphaka
U19 World Cup: भारताला फायनलमध्ये कांगारू पुन्हा नडले! ऑस्ट्रेलियाच्या यंगिस्तानने 14 वर्षांनी पटकावलं विश्वविजेतेपद

सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडू

19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान यजमान दक्षिण आफ्रिकेच्या क्वेना मफाकाने मिळवला. त्याने या संपूर्ण स्पर्धेत शानदार गोलंदाजी करत फलंदाजांना भांडावून सोडले होते.

त्याने 6 सामन्यांत 53.3 षटके गोलंदाजी करताना 21 विकेट्स घेतल्या. त्याच्या पाठोपाठ पाकिस्तानचा उबेद शाह आणि भारताचा सौम्य पांडे आहेत. या दोघांनी प्रत्येकी 18 विकेट्स घेतल्या.

19 वर्षांखालील वर्ल्डकप 2024 स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज -

  • 21 विकेट्स - क्वेना मफाका (दक्षिण आफ्रिका) (6 सामने)

  • 18 विकेट्स - उबेद शाह (पाकिस्तान) (६ सामने)

  • 18 विकेट्स - सौम्य पांडे (भारत) (7 सामने)

  • 14 विकेट्स - ताझिम अली (इंग्लंड) (4 सामने)

  • 14 विकेट्स - कॅलम विडलर (ऑस्ट्रेलिया) (6 सामने)

  • 13 विकेट्स - टॉम स्ट्रेकर (ऑस्ट्रेलिया) (6 सामने)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com