Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

Ravindra Jadeja: रवींद्र जडेजाचा मोठा धमाका, दिल्ली कसोटीनंतर नवीन शिखर गाठणार!

Ravindra Jadeja ICC Ranking: आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत अनेक बदल पाहायला मिळत आहेत.

Manish Jadhav

Ravindra Jadeja ICC Ranking: आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत अनेक बदल पाहायला मिळत आहेत. मात्र, आनंदाची गोष्ट म्हणजे हे बदल टीम इंडिया आणि भारतीय खेळाडूंसाठी फायदेशीर ठरले आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनाही त्यांच्या कामगिरीचा फायदा झाला आहे.

दरम्यान, टीम इंडिया (Team India) कसोटीतही नंबर वन टीम बनली आहे. दुसरा कसोटी सामना जिंकून टीम इंडिया नंबर वन बनेल असे आधी मानले जात होते, पण आता भारतीय संघाने हे स्थान आधीच गाठले आहे.

दरम्यान, टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजाने चमकदार कामगिरी केली.

अशा परिस्थितीत, त्याने रेटिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. दरम्यान, दिल्लीत होणार्‍या दुसऱ्या सामन्यातही जर त्याने आपली शानदार कामगिरी कायम ठेवली, तर तो नवीन शिखर गाठू शकेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत रवींद्र जडेजाने चमकदार कामगिरी केली

जडेजा तब्बल पाच महिन्यांनंतर टीम इंडियासाठी मैदानात परतला आहे. मात्र, याआधी तो सौराष्ट्रकडून रणजी सामनाही खेळला आहे.

यानंतर त्याने टीम इंडियासाठी धमाका केला. पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्माने त्याच्याकडे चेंडू सोपवला तेव्हा त्याने पाच विकेट्स घेतल्या. त्या डावात टीम इंडियासाठी सर्वाधिक षटके टाकणारा खेळाडू रवींद्र जडेजा होता. त्याने एकूण 22 षटकात 47 धावा दिल्या.

यानंतर, अश्विनने जवळपास 16 षटके टाकली. त्याचबरोबर फलंदाजीचा विचार केला तर त्याने शानदार अर्धशतकी खेळी खेळली. रवींद्र जडेजाने 185 चेंडूत 70 धावा केल्या. त्यात नऊ चौकारांचा समावेश होता.

पहिल्या डावात पिछाडीवर पडल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ पुन्हा मैदानात आला, तेव्हा रवींद्र जडेजाने गोलंदाजीत कमाल केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT