Ravindra Jadeja: 'मिस यू...', टीम इंडियातील निवडीनंतर जडेजाची इमोशनल पोस्ट व्हायरल

रविंद्र जडेजाने भारतीय संघात 4 महिन्यांनी निवड झाल्यानंतर केलेली पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
Ravindra Jadeja in Test Team
Ravindra Jadeja in Test TeamDainik Gomantak

Ravindra Jadeja: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी वनडे आणि टी२० मालिकेसाठी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड झाली आहे. यातील कसोटी संघात अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाचे पुनरागमन झाले आहे. त्यानंतर आता जडेजाची एक इमोशनल पोस्ट व्हायरल होत आहे.

दरम्यान, बीसीसीआयने जडेजाची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी निवड करताना असेही स्पष्ट केली आहे की त्याची उपलब्धता त्याच्या फिटनेसवर अवलंबून आहे. त्यामुळे आता जडेजाला भारतीय संघात पुनरागमन करायचे असले, तरी त्याला त्याचा फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे.

Ravindra Jadeja in Test Team
Ravindra Jadeja: 'सर जडेजा' ला टक्कर देतोय हा धाकड, टीम इंडियात पुनरागमन करणे...!

त्याची कसोटी संघात निवड झाल्यानंतर जडेजाने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्याने त्याच्या कसोटी जर्सीचा फोटो शेअर केला आहे. यावर पोस्टला त्याने 'मिस यू, पण लवकरच...' असे कॅप्शन टाकले आहे.

यातून जडेजाने तो लवकरच भारताच्या कसोटी संघात दिसणार असल्याचे संकेत दिले आहेत. जडेजा खूप काळापासून दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर आहे. तो त्याचा भारताकडून शेवटचा सामना आशिया चषक २०२२ स्पर्धेत हाँग काँगविरुद्ध ३१ ऑगस्ट २०२२ रोजी खेळला होता. तसेच तो अखेरचा कसोटी सामना जुलै २०२२ स्पर्धेत खेळला होता.

Ravindra Jadeja in Test Team
Rivaba Jadeja: 'हॅलो MLA...' रवींद्र जडेजाची बायकोसाठी स्पेशल पोस्ट

जडेजाला त्याच्या दुखापतीमुळे गेल्यावर्षी झालेला टी२० वर्ल्डकपला देखील मुकावे लागले होते. आता भारतीय चाहते अपेक्षा करत आहेत की जडेजा पूर्ण तंदुरुस्त होऊन भारतीय संघात परतेल. कारण यावर्षी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. तसेच यावर्षी वनडे वर्ल्डकप देखील होणार आहे.

दरम्यान, जडेजा २४ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या रणजी ट्रॉफीतील सौराष्ट्रच्या अखेरच्या साखळी फेरी सामन्यात खेळताना दिसण्याची शक्यता आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयदेव शाह यांनी म्हटले आहे की 'जर तो सौराष्ट्रकडून खेळला, तर चांगले आहे. कदाचीत तो खेळेल. पण माझ्याकडे पुढील काही माहिती नाही.'

जडेजा काहीदिवसांपूर्वीच बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये होता. तिथे तो त्याचा रिहॅबिलेटेशन प्रोग्राम पूर्ण करत होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com