

पणजी: गोव्याच्या गोलंदाजांची प्रभावी मारा केल्यामुळे कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात यजमान ओडिशाला संथ फलंदाजीवर भर द्यावा लागला. बालनगीर येथील गांधी स्टेडियमवर सुरू असलेल्या एलिट ई गट सामन्यात गोव्याला पहिल्या डावातील आघाडी आघाडीची संधी आहे.
गोव्याने पहिल्या दिवसअखेरच्या ६ बाद १९५ वरून पहिल्या डावात सर्वबाद २५० धावा केल्या. शुक्रवारी दुसऱ्या दिवसअखेर ओडिशाने २ बाद २ धावांवरून ६२ षटकांत ४ बाद १२२ धावांपर्यंत मजल मारली. ते अजून १२८ धावांनी मागे आहेत. त्यांच्या वेदांत देव्हाडे याने तिसऱ्या विकेटसाठी प्रयान सामाल याच्यासह ५३ धावांची, तर आदित्य आनंद याच्यासह पाचव्या विकेटसाठी ४४ धावांची अभेद्य भागीदारी केली आहे.
संक्षिप्त धावफलक
गोवा, पहिला डाव (६ बाद १९५ वरून) : १०५.५ षटकांत सर्वबाद २५० (मोहित यादव ६८, चिगुरुपती व्यंकट ३३, मिहीर कुडाळकर १५, शमीक कामत ७, समर्थ राणे नाबाद १, कमलेश पात्रा ४-६७, जगदीश मोहापात्रा २-५७, शुभम पालाई ४-४४).
ओडिशा, पहिला डाव : ६२ षटकांत ४ बाद १२२ (प्रयान सामाल ३९, वेदांत देव्हाडे नाबाद ४०, आदित्य आनंद नाबाद २२, चिगुरुपती व्यंकट १६-१०-१७-१, शमीक कामत १४-४-३२-२, मिहीर कुडाळकर १३-४-२८-०, समर्थ राणे १४-५-१९-१, मोहित यादव १-०-८-०, आदित्य कोटा ४-०-१४-०).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.