Mayank Agarwal
Mayank Agarwal Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: IPLमध्ये पहिल्यांदाच मयंक अग्रवाल करणार पंजाब किंग्जचे नेतृत्व

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 च्या हंगामात पंजाब किंग्जने मयंक अग्रवालला आपला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. मयंकच्या नेतृत्वाखाली पंजाबचा संघ आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये खेळणार आहे. मयंक अग्रवालच्या आधी लोकेश राहुल (Lokesh Rahul) या संघाचा कर्णधार होता. अग्रवालने यापूर्वी कोणत्याही आयपीएल संघाचे नेतृत्व केलेले नाही. या हंगामात तो आधीच कर्णधार मानला जात होता. मेगा लिलावापूर्वी पंजाब संघाने (Punjab Kings) केवळ दोन खेळाडूंना कायम ठेवले होते. मयंक अग्रवाल हा पहिला खेळाडू होता ज्याला फ्रेंचायझीने रोखले होते. त्याच्याशिवाय अनकॅप्ड वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला कायम ठेवण्यात आले आहे. यानंतर मयंकचे कर्णधारपद निश्चित असल्याचे मानले जात होते. (Punjab Kings Have Appointed Mayank Agarwal As Their New Captain)

दरम्यान, पंजाब किंग्सच्या संघाने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरुन नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. संघाचा कर्णधार बनवल्यावर मयंक म्हणाला, 'आयपीएल 2022 मध्ये पंजाब किंग्जचे कर्णधारपद मिळाल्याने खूप आनंद होत आहे.' यावेळी तो पंजाबसाठी विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देखील म्हटले जात आहे. पंजाब संघाने आतापर्यंत एकही आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही.

पंजाबचा संघ ब गटात

आयपीएल 2022 मध्ये पंजाबला ब गटात ठेवण्यात आले आहे. यामध्ये त्याला चेन्नई, हैदराबाद, दिल्ली, बंगळुरु आणि गुजरातसोबत प्रत्येकी दोन सामने खेळावे लागणार आहेत. त्याचबरोबर मुंबई, कोलकाता, राजस्थान आणि लखनऊविरुद्ध एक सामना खेळावा लागणार आहे.

मयंकपूर्वी राहुल कर्णधार होता

मयंक अग्रवालच्या आधी लोकेश राहुल पंजाब किंग्जचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली पंजाबने दोन मोसमात शानदार कामगिरी केली होती. मात्र, मेगा लिलावापूर्वी राहुलने संघापासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर लखनऊच्या टीमने त्याला 17 कोटी रुपये देऊन आपल्या संघात सामील करुन घेतले. यानंतर मयंक पंजाब संघाच्या कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. आणि विशेष म्हणजे त्याच्याकडे संघाची कमान सोपवण्यात आली. राहुलच्या नेतृत्वाखालील संघाने सुमारचं कामगिरी केली होती. गेल्या मोसमात त्याच्या संघाने अनेक सामने जिंकता-जिंकता हरले होते. हा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर होता. पंजाबने 14 पैकी सहा सामने जिंकले होते, तर 8 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

दरम्यान, 2022 च्या मेगा लिलावापूर्वी पंजाबने सर्वात कमी खेळाडूंना कायम ठेवले आहे. पंजाबने केवळ दोन खेळाडूंना कायम ठेवले आहे. आता या संघात शिखर धवन (Shikhar Dhawan), कागिसो रबाडा, लियाम लिव्हिंगस्टोन आणि जॉनी बेअरस्टो यांच्याकडे संघाची कमान असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT