अफगाणिस्तान मालिकेपूर्वी टीम इंडियाला 'बॅक टू बॅक' मोठा झटका, विराट पाठोपाठ आता 'हा' स्टार फलंदाजही जखमी; संघाला दुखापतीचं ग्रहण

Shreyas Iyer Injury Mumbai T20 League: टीम इंडियासाठी एकामागून एक अत्यंत वाईट बातम्या समोर येत आहेत. टीममध्ये लागलेल्या दुखापतींच्या ग्रहणामुळे टीम इंडियाचे टेन्शन चांगलेच वाढले.
Shreyas Iyer Injury Mumbai T20 League
Shreyas IyerDainik Gomantak
Published on
Updated on

Shreyas Iyer Injury Mumbai T20 League: आयपीएल 2026 चा थरार नुकताच संपला असून भारतीय खेळाडू आता आगामी आंतरराष्ट्रीय मालिकांसाठी कसून तयारी करत आहेत. मात्र, ही तयारी सुरु असतानाच टीम इंडियासाठी एकामागून एक अत्यंत वाईट बातम्या समोर येत आहेत. टीममध्ये लागलेल्या दुखापतींच्या ग्रहणामुळे टीम इंडियाचे टेन्शन चांगलेच वाढले. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतून आधीच बाहेर पडला. कोहलीच्या या धक्क्यातून भारतीय पाठीराखे सावरत नाहीत, तोच आता मध्यमफळीतील स्टार फलंदाज श्रेयस अय्यर याच्या दुखापतीने निवड समिती आणि व्यवस्थापनाची झोप उडवली.

आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर श्रेयस अय्यर सध्या 'मुंबई टी-20 लीग'मध्ये खेळत आहे. या लीगमध्ये सोबो मुंबई फाल्कन्स संघाचे प्रतिनिधित्व करताना, फलंदाजी दरम्यान अय्यरला दुखापत झाली. ही दुखापत इतकी गंभीर होती की मैदानावरील फिजिओला तातडीने धाव घ्यावी लागली. फिजिओने मैदानावरच श्रेयस अय्यरवर बराच वेळ उपचार केले. या उपचारानंतर अय्यरने धीर दाखवत पुन्हा फलंदाजी सुरु केली खरी, मात्र तो खेळताना पूर्णपणे असहज दिसत होता आणि त्याला धावताना प्रचंड त्रास होत होता. या शारीरिक अडचणींमुळेच त्याला मोठी खेळी करता आली नाही आणि त्याने 24 चेंडूत केवळ 30 धावा केल्या.

Shreyas Iyer Injury Mumbai T20 League
Team India: क्रीडा जगतात मोठी खळबळ! टीम इंडियाच्या प्रशिक्षकावर लैंगिक शोषणाचा आरोप, थेट हकालपट्टीची कारवाई

श्रेयस अय्यरसाठी (Shreyas Iyer) दुखापतींचे हे सत्र नवीन नाही; गेल्या दोन वर्षांपासून तो वारंवार पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. याच पाठीच्या जुन्या त्रासामुळे त्याला भारतीय कसोटी संघातूनही आपले स्थान गमवावे लागले होते आणि त्याने अनेक महत्त्वाचे सामने मिस केले आहेत.

हा दुखापतीचा झटका अशा वेळी बसला, जेव्हा श्रेयस अय्यरच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला एक मोठी आणि सकारात्मक कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विविध क्रीडा रिपोर्ट्सनुसार, खराब फॉर्मशी झगडत असलेल्या सूर्यकुमार यादवला भारतीय टी-20 संघाच्या कर्णधारपदावरुन आणि संघातूनही डच्चू दिला जाऊ शकतो. अशा स्थितीत सूर्यकुमारच्या जागी श्रेयस अय्यरला टीम इंडियाचा नवीन टी-20 कर्णधार बनवले जाण्याची दाट शक्यता आहे.

Shreyas Iyer Injury Mumbai T20 League
Team India Cricket Schedule: BCCI चा धमाका! टीम इंडियाचं 2026-27 मधील देशातील हंगामाचं वेळापत्रक जाहीर; 17 शहरात रंगणार 22 सामन्यांचा थरार

प्रदीर्घ काळानंतर अय्यरसाठी भारतीय क्रिकेट वर्तुळात काहीतरी खूप चांगले घडत असतानाच ही दुखापत समोर आली. टी-20 संघाचे कर्णधारपद मिळवणे आणि वनडे-टी20 या दोन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा नियमित सदस्य बनणे, हे श्रेयस अय्यरचे मुख्य ध्येय आहे. यासाठी त्याला पूर्णपणे तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे. आता त्याची ही ताजी दुखापत किती गंभीर आहे आणि तो अफगाणिस्तान मालिकेपूर्वी तंदुरुस्त होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com