Goa Bison Attack: "अचानक समोर आला अन्" सुर्ल-पाळी मुख्य रस्त्यावर दुचाकीस्वाराला गव्यानं उडवलं! स्थानिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण!

Goa Wild Bison: सुर्ल-तारीर-पाळी भागात गव्यांनी हैदोस घातला असून बागायतींची हानी करण्याबरोबरच स्थानिकांच्या मनात धडकी भरवली आहे.
Goa Wild Bison
Goa Bison AttackDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: सुर्ल-तारीर-पाळी भागात गव्यांनी हैदोस घातला असून बागायतींची हानी करण्याबरोबरच स्थानिकांच्या मनात धडकी भरवली आहे. येथील तारीर भागात गव्यांचा स्वैरसंचार सुरू असून, सुर्ल-पाळी मुख्य रस्त्यावर मंगळवारी रात्री न्हावेलीहून उसगावच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला गव्याने धडक दिली.

या घटनेत दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेला; मात्र तो किरकोळ जखमी झाला. फोंडा तालुक्यात गव्याच्या हल्ल्यात एका गृहरक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता गवे आणि रेडे सुर्ल-पाळी भागात दिसू लागल्याने स्थानिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Goa Wild Bison
Goa Bison Attack: गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पाठीत शिंग खुपसले; स्थानिकांत भीतीचे वातावरण

रस्त्याने चालणारे पादचारी तसेच दुचाकीस्वार यांच्यामध्ये विशेषतः भीतीचे वातावरण असून, या गव्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. सुर्ल-पाळी भागात गेल्या सहा महिन्यांपासून गव्यांचे दर्शन अधूनमधून होत आहे. सुर्ल आणि पाळी हा खाणींचा परिसर असून, या भागातही गव्यांचा मुक्त वावर वाढला आहे.

तारीर भागात अचानक दुचाकीसमोर गवे येण्याच्या घटना घडत असून, सुर्लहून वळवईकडे जाणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीती पसरली आहे. सरकारी यंत्रणा आणि वन खात्याने या प्रकरणाची त्वरित दखल घेऊन या भागातील गव्यांना जंगलाच्या दिशेने हुसकावून लावावे आणि नागरिकांची भीती दूर करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com