IPL 2022: विराट कोहलीने आरसीबी सोडले! अनेक संघांनी साधला संपर्क

पण शेवटी त्याने आपला विचार बदलला आणि आरसीबीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आयपीएलमध्ये एकाच फ्रँचायझीसाठी खेळणारा विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे.
Virat Kohli
Virat KohliDainik gomantak

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीने खुलासा केला आहे की, त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सोडण्याचा निर्णय घेतला होता, अनेक संघांनीही संपर्क साधला होता. पण शेवटी त्याने आपला विचार बदलला आणि आरसीबीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आयपीएलमध्ये (Ipl 2022) एकाच फ्रँचायझीसाठी खेळणारा विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे.

Virat Kohli
पोलंड रशियावर 'खफा', FIFA वर्ल्ड कप क्वालिफायर फेरी खेळण्यास दिला नकार

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पॉडकास्टवर बोलतांना विराट कोहली म्हणाला की, असे अनेक वेळा अशी वेळ आली की, त्याने वेगळ्या संघात जाण्याचा विचार केला होता. पण अखेर त्याने आरसीबीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. कोहलीला त्याच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे (Ipl) जेतेपद पटकावता आलेले नाही.

विराट कोहली म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचे तर, मी याबद्दल विचार केला आहे आणि इतरांनी मला लिलावात घेण्यासाठी कसा तरी संपर्क केला आहे. पण मग मी पून्हा विचार केला की, असे अनेक महान लोक असतील ज्यांनी ट्रॉफी जिंकल्या असतील परंतु कोणीही तुम्हाला अशा प्रकारे संबोधित करत नाही. कोणीही तुम्हाला आयपीएल चॅम्पियन किंवा वर्ल्ड कप चॅम्पियन म्हणत नाही.

कोहली ( Virat Kohali ) पुढे म्हणाला, “माझ्यासाठी RCB बद्दलची निष्ठा ही ‘तुम्ही XYZ सह शेवटी आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे’ असे म्हणणाऱ्यांपेक्षा जास्त आहे. तुम्हाला पाच मिनिटे खूप छान वाटेल आणि मग तुम्ही इतर कोणत्यातरी समस्येमुळे नाखूष असाल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या कर्णधारपदावरून पायउतार झालेला विराट कोहली म्हणाला की, मी स्वत:साठी आणि कामाचा ताण व्यवस्थापनासाठी थोडा वेळ काढण्याचा निर्णय घेतला.

आरसीबीचे कर्णधारपद सोडताना कोहली 'द आरसीबी पॉडकास्ट'वर म्हणाला, 'मी अशा लोकांपैकी नाही ज्यांना गोष्टी रोखून ठेवायच्या आहेत. जरी मला माहित आहे की मी खूप काही करू शकतो, परंतु जर मला प्रक्रियेचा आनंद मिळत नसेल तर मी ते काम करणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com