Pakistan Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

PAK vs BAN: पाकिस्तानने Super 4 चा पहिला सामना जिंकला, बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव

Asia Cup 2023: आशिया चषक 2023 च्या सुपर-4 टप्प्यातील पहिला सामना बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला.

Manish Jadhav

Asia Cup 2023: आशिया चषक 2023 च्या सुपर-4 टप्प्यातील पहिला सामना बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला.

आशिया चषक 2023 मधील तीन सामन्यांमधला पाकिस्तानचा हा दुसरा विजय आहे. आशिया चषक 2023 च्या ग्रुप-ए सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा 238 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला होता.

यानंतर 2 सप्टेंबरला ग्रुप-ए मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानचा दुसरा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला.

सुपर-4 च्या पहिल्याच सामन्यात बांगलादेशचा पराभव करुन पाकिस्तानने शानदार सुरुवात केली आहे. आता सुपर-4 मध्ये पाकिस्तानचा पुढचा सामना भारताविरुद्ध 10 सप्टेंबर रोजी होणार आहे.

सुपर-4 च्या पहिल्याच सामन्यात PAK ने बांगलादेशचा पराभव केला

दरम्यान, लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सुपर-4 सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, पाकिस्तानच्या (Pakistan) वेगवान गोलंदाजांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत बांगलादेशचा संघ 38.4 षटकांत अवघ्या 193 धावांत गुंडाळला.

प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या फलंदाजांनी 39.3 षटकांतच लक्ष्य गाठले. पाकिस्तानकडून इमाम उल हकने सर्वाधिक 78 धावा केल्या आहेत.

बांगलादेशचा संघ 193 धावांवर गडगडला

दुसरीकडे, हारिस रौफ आणि नसीम शाह यांच्या झंझावाती गोलंदाजीमुळे पाकिस्तानने बांगलादेशचा डाव 193 धावांत गुंडाळला.

पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज हारिस रौफने 4, नसीम शाहने 3 आणि शाहीन आफ्रिदी, फहीम अश्रफ आणि इफ्तिखार अहमदने 1-1 बळी घेतले.

मुशफिकुर रहीम आणि शाकिब अल हसन यांच्याशिवाय बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही.

पॉवर प्लेमध्येच संघाने 47 धावांत आपले पहिले 4 विकेट गमावले होते, तर 30 ते 39 षटकांत संघाने 47 धावा करुन सहा विकेट गमावल्या होत्या.

इमाम-रिजवान यांची तूफानी खेळी

तसेच, 194 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानी संघासाठी सलामीवीर इमाम-उल-हकने अप्रतिम कामगिरी केली. इमामने या सामन्यात 84 चेंडूत 78 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार मारले.

त्याला मोहम्मद रिझवानची चांगली साथ मिळाली. त्याने 7 चौकार आणि 1 षटकार मारत नाबाद 63 धावा केल्या. तर फखर जमानने 20 आणि कर्णधार बाबर आझमने 17 धावा केल्या.

बांगलादेशकडून (Bangladesh) तस्किन अहमद, शोरफुल इस्लाम आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

आफ्रिदीने लिटनला झेलबाद केले

बांगलादेशने मागील सामन्यातील शतकवीर मेहदी हसन मिराजची (0) विकेट दुसऱ्या षटकात गमावली, ज्याने नसीमच्या चेंडूवर फखर झमानकडे झेल दिला.

मोहम्मद नईम (20) आणि लिटन दास (16) यांनी फटकेबाजी करत धावसंख्या 31 धावांपर्यंत नेली. मात्र, शाहीन शाह आफ्रिदीने लिटनला उसळत्या चेंडूवर यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानकरवी झेलबाद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT