BAN vs AFG: रहमानउल्लाह-इब्राहिम जोडीने रचला इतिहास, अफगाणिस्तानसाठी नोंदवली सर्वात मोठी भागीदारी

BAN vs AFG: बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी चितगाव येथे खेळवला जात आहे.
 Rahmanullah Gurbaz & Ibrahim Zadran
Rahmanullah Gurbaz & Ibrahim Zadran Dainik Gomantak
Published on
Updated on

BAN vs AFG: बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी चितगाव येथे खेळवला जात आहे.

या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना अफगाणिस्तानने दमदार सुरुवात केली. संघाचे सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम जादरान यांनी 256 धावांची शानदार भागीदारी केली.

इब्राहिम आणि रहमानउल्ला यांनी इतिहास रचला

खरे तर, अफगाणिस्तानसाठी एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम या सामन्यापूर्वी मोहम्मद शहजाद आणि करीम सादिक यांच्या नावावर होता. या दोघांनी स्कॉटलंडविरुद्ध 218 धावांची भागीदारी केली होती.

मात्र, शनिवारी बांगलादेशविरुद्ध (Bangladesh) खेळल्या जात असलेल्या सामन्यात इब्राहिम जादरान आणि रहमानउल्ला या जोडीने सर्व विक्रम मोडीत काढले. त्यांनी 256 धावांची भागीदारी करत यादीत अव्वल स्थान मिळवले. अफगाणिस्तानसाठी ही तिसरी सर्वात मोठी द्विशतकी भागीदारी आहे.

 Rahmanullah Gurbaz & Ibrahim Zadran
BAN vs AFG: कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशने गाठला मोठा टप्पा, कसोटी इतिहासातील 'हे' पाच सर्वात मोठे विजय!

अफगाणिस्तानसाठी सर्वोच्च भागीदारी: अफगाणिस्तानसाठी सर्वोच्च भागीदारी

1. रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम जादरान - 256 धावा

2. मोहम्मद शहजाद आणि करीम सादिक – 218 धावा

3. नूर अली जादरान आणि मोहम्मद शहजाद - 205 धावा

4. रहमत शाह आणि इब्राहिम जादरान - 195 धावा

5. रहमत शाह आणि हस्तमुल्ला शाह - 184 धावा

 Rahmanullah Gurbaz & Ibrahim Zadran
AFG Vs PAK: अफगाणिस्तानविरुद्ध पाकिस्तानने गमावली T20 सीरीज, शादाब म्हणाला- 'देशासाठी...'

रहमतुल्ला गुरबाजने शतक झळकावले

केकेआरकडून सलामी देणारा युवा फलंदाज रहमतुल्ला गुरबाजने आक्रमक सुरुवात केली. त्याने 145 धावांची तूफानी खेळी खेळली. त्याच्या कारकिर्दीतील हे चौथे शतक ठरले. गुरबाजने आपल्या खेळीत 13 चौकार आणि 8 षटकार मारले. त्याचबरोबर अफगाणिस्तानची (Afghanistan) धावसंख्या 300 च्या जवळ पोहोचली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com