

मडगाव: मनोज परब हे राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी त्यांना काहीतरी बोलून लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणे आवश्यक आहेच. सध्या ते तेच करत आहेत, असा टोला गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आज लगावला.
‘माझा पक्ष कसा चालवायचा, याचा सल्ला मला कोणाकडूनही नको आहे,’ अशा शब्दांत सरदेसाई यांनी परब यांच्यावर निशाणा साधला. गेल्या अनेक महिन्यांपासून मनोज परब चर्चेत नसल्याने केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी ते अशी वक्तव्ये करत असल्याचा टोलाही सरदेसाई यांनी लगावला.
आरजीपी पक्षात पुनर्प्रवेश करताना मनोज परब यांनी विजय सरदेसाई यांच्यावर टीका करताना त्यांना विरोधकांच्या एकीत रस नाही उलट भाजपच्या सांगण्यावरून ते विरोधक एकत्र येऊ नयेत यासाठी प्रयत्न करतात असा आरोप केला होता.
‘काँग्रेसने युतीचा निर्णय लवकर घ्यावा’
आगामी निवडणुकीतील युतीच्या मुद्यावर बोलताना सरदेसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, युतीसंदर्भात माझ्या बाजूने मी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. आता यावर अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी पूर्णपणे काँग्रेसची आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय होणे गरजेचे आहे, कारण निर्णय घेण्यास होणारा विलंब हा थेट भाजपच्या पथ्यावर पडेल, असा इशाराही विजय सरदेसाई यांनी दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.