Pakistan Cricket Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: भारतात येण्यासाठी पाकिस्तान संघ व्हिसाच्या प्रतिक्षेत, टीम बाँडिंग सेशनही झाले रद्द

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघाला 29 ऑक्टोबर रोजी वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील पहिला सराव सामना हैदराबादला खेळायचा असून ते सध्या व्हिसाच्या प्रतिक्षेत आहेत.

Pranali Kodre

Pakistan Cricket team waiting for visa for ICC ODI World Cup 2023 India:

भारतात 5 ऑक्टोबरपासून 19 नोव्हेंबर दरम्यान वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्याआधी 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान सराव सामने खेळवले जाणार आहेत. मात्र आता सराव सामने सुरू होण्यासाठी एक आठवडाच राहिलेला असताना असे समोर येत आहे की पाकिस्तान संघाला भारतात येण्यासाठी व्हिसा मिळण्यात अडचणी येत आहेत.

पाकिस्तानला व्हिसा मिळण्यास येणाऱ्या अडचणींमुळे त्यांचे स्पर्धेपूर्वी दुबईत होणारे टीम बॉडिंग सेशन रद्द करावे लागले आहे. इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतात येण्यासाठी अद्यापही पाकिस्तानचा संघ व्हिसाची वाट पाहात आहे.

पाकिस्तानची योजना अशी होती की ते हैदराबादला पहिल्या सराव सामन्यासाठी जाण्यापूर्वी दुबईत काही दिवस टीम बॉडिंग सेशन करतील. तथापि, व्हिसासाठी उशीर झाल्याने त्यांना ही योजना बदलावी लागली आहे. आता पाकिस्तान संघ 27 सप्टेंबर रोजी लाहोरहून दुबईला जातील, तेथून ते हैदराबादला रवाना होतील.

दरम्यान, असे असले तरी अनेक मीडियातील रिपोर्ट्सनुसार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला विश्वास आहे की त्यांना सराव सामन्यांपूर्वी व्हिसा मिळतील.

पाकिस्तानला पहिला सराव सामना 29 सप्टेंबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना खेळायचा आहे. हे दोन्ही सामने हैदराबादला होणार आहेत. यानंतर पाकिस्तान मुख्य वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील पहिला सामना नेदरलँड्सविरुद्ध हैदराबादमध्ये खेळायचा आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की यापूर्वीही भारताने यावर्षी झालेल्या आशिया चषकातील सामने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता, त्यानंतर पाकिस्तानच्या वर्ल्डकप २०२३ स्पर्धा खेळण्यावर प्रश्नचिन्ह होते. पाकिस्तानही 2023 वर्ल्डकपसाठी भारतात येण्यासाठी नकार देईल अशी चर्चा होती. मात्र, ऑगस्ट 2023 मध्ये पाकिस्तान संघाला भारतात येण्यासाठी सरकारकडून मंजुरी मिळाली.

पाकिस्तानने वर्ल्डकप 2023 साठी त्यांचा 15 जणांचा संघही जाहिर केला आहे. मात्र, पाकिस्तान या वर्ल्डकपमध्ये नसीम शहाच्या अनुपस्थितीत उतरणार आहे. त्याला दुखापत झाल्याने तो खेळणार नाही. त्याच्या जागेवर हसन अलीला संघात संधी मिळाली आहे. पाकिस्तान संघाचे नेतृत्व बाबर आझम करणार आहे.

  • पाकिस्तान संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्लाह शफिक, मोहम्मद रिझवान, सौद शकिल, इफ्तिखर अहमद, सलमान अली आघा, मोहम्मद नवाझ, उस्मान मीर, हॅरिस रौफ, हसन अली, शाहिन आफ्रिदी, मोहम्मद वासिम.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT