World Cup Prize Money: विजेते अन् उपविजेतेच नाही, तर सर्व 10 संघ होणार मालामाल, ICC ने केली बक्षीसाची घोषणा

World Cup 2023 Prize Money: आयसीसीने वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी सर्व 10 संघांसाठी बक्षीस रक्कमेची घोषणा केली आहे.
ODI World Cup 2023 Tickets
ODI World Cup 2023 TicketsDainik Gomantak

ICC Announced Prize Money for ODI Cricket World Cup 2023 India :

भारतात यंदा वनडे वर्ल्डकप खेळवण्यात येणार आहे. हे वनडे वर्ल्डकपचे 13 वे पर्व असणार असून 5 ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या या कुंभमेळ्याला सुरुवात होईल. दरम्यान, आयसीसीने या स्पर्धेसाठी बक्षीस रकमेची घोषणा केली आहे.

आयसीसीने घोषणा केल्याप्रमाणे फक्त विजेत्या आणि उपविजेत्या संघालाच नाही, तर वर्ल्डकपमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला बक्षीस रक्कम दिली जाणार आहे. आयसीसीने यंदाच्या वनडे वर्ल्डकपसाठी 10 मिलियन अमेरिकन डॉलरची (भारतीय चलनानुसार साधारण 84 कोटी रुपये) बक्षीस म्हणून तरतुद केली आहे.

या 10 मिलियन अमेरिकन डॉलरपैकी 4 मिलियन (साधारण 33 कोटी रुपये) विजेत्या संघाला मिळणार आहेत. तसेच उपविजेत्या संघाला 2 मिलियन अमेरिकन डॉलर (सारारण 16.5 कोटी रुपये) मिळणार आहेत.

ODI World Cup 2023 Tickets
World Cup 2023: नव्या-जुन्यांचा मेळ साधत पाकिस्तानने जाहिर केला संघ, नसीम शाह बाहेर, 'या' 15 जणांना संधी

याशिवाय उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही संघांना प्रत्येकी 800,000 अमेरिकन डॉलर (साधारण 6 कोटी 64 लाख रुपये) मिळणार आहेत.

इतकेच नाही तर साखळी फेरीत प्रत्येक सामना जिंकल्यानंतर संघाला 40,000 अमेरिकन डॉलर (33 लाख रुपये) रुपये मिळणार आहेत. म्हणजेच या स्पर्धेत साखळी फेरीत एकूण 45 सामने होणार आहेत. त्यामुळे 45 सामन्यांच्या 45 विजेत्यांना मिळून 1,800,000 अमेरिकन डॉलरचे वाटप करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर ज्या 6 संघांचे साखळी फेरीनंतर वर्ल्डकपमधील आव्हान संपेल, त्यांना या फेरीनंतर प्रत्येकी 100,000 अमेरिकन डॉलर (83 लाख रुपये) मिळतील. म्हणजेच एकूण 600,000 अमेरिकन डॉलर बक्षीस रकमेचे वाटप करण्यात येणार आहे. हे सर्व बक्षीस रक्कम मिळून 10 मिलियन डॉलर इतकी होत आहे.

ODI World Cup 2023 Tickets
Cricket World Cup 2023: गोव्याचे पंच सय्यद खलिद यांना मोठी संधी; वर्ल्डकपमध्ये 2 सामन्यांत करणार पंचगिरी

महिला संघांनाही समान वाटप

दरम्यान, आयसीसीने यापूर्वीच घोषित केल्याप्रमाणे 2025 साली होणाऱ्या महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठीही पुरुषांच्या 2023 वनडे वर्ल्डकपप्रमाणेच समान बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे.

46 दिवसांचा थरार

वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँड्स हे 10 संघ खेळणार आहेत. हे सर्व 10 संघ साखळी फेरीत एकमेकांविरुद्ध खेळतील. त्यानंतर पहिले चार संघ उपांत्य फेरीत खेळतील, तर उपांत्य सामन्यातील विजेते संघ 19 नोव्हेंबर रोजी अंतिम सामन्यात भिडणार आहेत.

या स्पर्धेत मिळून 48 सामने होणार असून ही स्पर्धा 46 दिवस एकूण 10 ठिकाणांवर होणार आहे. 48 सामने हैदराबाद, अहमदाबाद, धरमशाला, दिल्ली, चेन्नई, लखनऊ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलाकाता या 10 शहरात मिळून होणार आहेत. 

दरम्यान, मुख्य स्पर्धा सुरू होण्यापूर्वी 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान गुवाहाटी, तिरुअनंतपुरम आणि हैदराबाद या 3 ठिकाणी सराव सामने होणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com