Pakistan Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2023 च्या तोंडावर पाकिस्तानने केले मोठे बदल, 'या' खेळाडूचा संघात समावेश

Pakistan Squad: पाकिस्तान संघाने आशिया चषकाच्या संघात मोठे बदल केले आहेत.

Pranali Kodre

Pakistan Squad for Asia Cup 2023:

आशिया चषक 2023 स्पर्धा 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील पहिलाच सामना मुलतानला पाकिस्तान विरुद्ध नेपाळ संघात खेळवला जाणार आहे. पण या स्पर्धेला आता तीन दिवसच राहिले असताना पाकिस्तान संघाने संघात मोठा बदल केला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने संघात आधी सामील केलेल्या तय्यब ताहिरला आता राखीव खेळाडू म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे तो संघाबरोबर राखीव खेळाडू म्हणून येईल. तसेच त्याच्या जागेवर मधल्या फळीतील फलंदाज सौद शकिल याचा संघात समावेश केला आहे.

शकिलचा यापूर्वी पाकिस्तानने आशिया चषकासाठी घोषित केलेल्या १७ जणांच्या संघात समावेश नव्हता. तो अफगाणिस्तानविरुद्ध नुकत्याच खेळलेल्या वनडे मालिकेचा मात्र भाग होता. तो या मालिकेत एकच सामना खेळला आणि त्याने 9 धावा केल्या. तय्यबला मात्र अफगाणिस्तानविरुद्ध एकाही वनडे सामन्यात संधी मिळाली नाही.

दरम्यान, या आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ मुलतानला रवाना झाला आहे. त्यांचा साखळी फेरीसाठी भारत आणि नेपाळ संघासह अ गटात समावेश आहे. नेपाळविरुद्ध 30 ऑगस्टला सामना खेळल्यानंतर पाकिस्तानला 2 सप्टेंबर रोजी भारताविरुद्ध कँडी, श्रीलंका येथे सामना खेळायचा आहे.

या स्पर्धेत ब गटात बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघांचा समावेश आहे. साखळी फेरीतील प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर फोर फेरीत प्रवेश करतील. सुपर फोर फेरीत देखील चार संघात साखळी पद्धतीने सामने खेळवले जातील, यातून गुणतालिकेतील अव्वल दोन संघ 17 सप्टेंबर दरम्यान अंतिम सामना कोलंबोला खेळणार आहेत.

या स्पर्धेतील 4 सामने पाकिस्तानला होणार आहेत, तर 9 सामने श्रीलंकेत होणार आहेत.

  • आशिया चषकासाठी पाकिस्तान संघ - अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हॅरीस, शादाब खान (उपकर्णधार) , मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हारिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, सौद शकिल.

    राखीव खेळाडू - तय्यब ताहिर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: ‘मोंथा’चा गोव्‍यालाही बसणार फटका! आणखी 3 दिवस मुसळधार, वेगवान वारे वाहणार; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Caranzalem Beach:गोव्यात ‘ओशेनमॅन’ स्पर्धा मच्छिमारांनी रोखली, मिलिंद सोमणसह स्पर्धकांना फटका; आयोजकावर फसवणुकीचा गुन्हा Watch Video

Horoscope: घरात मंगलकार्याची चर्चा,कामात थोडे अडथळे येऊ शकतात; संयम ठेवा

Delhi Crime: एक महिन्यापासून देता होता त्रास, दुचाकीवरुन पाठलाग करुन विद्यार्थिनीवर केला ॲसिड हल्ला; ओळखीतल्या तरुणासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Ajinkya Rahane: "टीम इंडियाला माझी गरज..." 159 धावांच्या धडाकेबाज खेळीनंतर अजिंक्य रहाणेने निवडकर्त्यांवर साधला निशाणा!

SCROLL FOR NEXT