Asia Cup 2023: बांगलादेशला मोठा झटका! 'हा' स्टार वेगवान गोलंदाज आशिया चषक स्पर्धेतून बाहेर

Ebadot Hossain: इबादतचा 10 दिवसांपूर्वी आशिया चषक स्पर्धेसाठी 17 जणांच्या संघात समावेश करण्यात आला होता, पण तो निर्धारित वेळेत दुखापतीतून सावरण्यात अपयशी ठरला होता.
Ebadot Hossain
Ebadot HossainDainik Gomantak
Published on
Updated on

Asia Cup 2023: बांगलादेशचा वेगवान गोलंदाज इबादत हुसेन मंगळवारी गेल्या महिन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान गुडघ्याच्या दुखापतीमुळे आगामी आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडला.

इबादतचा 10 दिवसांपूर्वी आशिया चषक स्पर्धेसाठी 17 जणांच्या संघात समावेश करण्यात आला होता, पण तो निर्धारित वेळेत दुखापतीतून सावरण्यात अपयशी ठरला होता.

दरम्यान, इबादतच्या जागी 20 वर्षीय अनकॅप्ड वेगवान गोलंदाज तंजीम हसनचा बांगलादेश संघात समावेश करण्यात आला आहे.

5 ऑक्टोबरपासून भारतात (India) होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी 29 वर्षीय खेळाडू वेळेत तंदुरुस्त होईल की नाही हे पाहणे बाकी आहे.

Ebadot Hossain
Asia Cup 2023: सूर्य उगवणार! टीम इंडियातून वगळल्यानंतर युझी चहलची सूचक पोस्ट व्हायरल

'ESPNcricinfo' ने बांगलादेश (Bangladesh) क्रिकेट बोर्डाचे मुख्य चिकित्सक डॉ देवाशिष चौधरी यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, "इबादत सहा आठवड्यांपासून रिहॅबिलिटेशनमध्ये आहे. यादरम्यान आम्ही त्याचे अनेक वेळा एमआरआय केले पण तो दुखापतीतून पूर्णपणे बरा होऊ शकला नाही.

Ebadot Hossain
Asia Cup 2023: फक्त चहलच नाही, तर 'या' 5 अनुभवी खेळाडूंचाही भारतीय संघातून झाला पत्ता कट

आशिया चषक 2023 साठी बांगलादेशचा संघ: शकीब अल हसन (कर्णधार), लिटन दास, नजमुल हुसेन शांतो, तौहिद हृदोय, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसेन, मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम, नसुम अहमद, नसुम अहमद हसन मोहम्मद नईम, शमीम हुसेन, तनजीद हसन आणि तंजीम हसन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com