Mumbai City
Mumbai City Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League: मुंबई सिटीची हुकली संधी

किशोर पेटकर

पणजी : झुंजार वृत्ती प्रदर्शित केलेल्या नॉर्थईस्ट युनायटेडच्या प्रतिहल्ल्यामुळे आठव्या इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेत मुंबई सिटीची संधी हुकली. 1-1 गोलबरोबरीमुळे गतविजेत्यांना हैदराबाद व केरळा ब्लास्टर्स या अव्वल संघांना गाठणे शक्य झाले नाही. (Northeast United held Mumbai City To A Draw)

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर मंगळवारी अहमद जाहू याच्या पेनल्टी गोलमुळे मुंबई सिटीने 30व्या मिनिटास आघाडी घेतली. नंतर बदली खेळाडू महंमद इर्शाद याच्या गोलमुळे नॉर्थईस्ट युनायटेडने 79व्या मिनिटास बरोबरी साधली. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातही नॉर्थईस्ट युनायटेडने (Northeast United) मुंबई सिटीस 3-3 असे गोलबरोबरीत रोखले होते.

मुंबई सिटी आता सहा लढती विजयाविना आहे. तीन बरोबरी व तीन पराभवामुळे त्यांना फक्त तीनच गुण नोंदविता आले. सामन्याच्या भरपाई वेळेत मुंबई सिटीच्या अमेय रानावडे याला सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे रेड कार्डसह मैदान सोडावे लागले, त्यामुळे त्यांना बाकी दोन मिनिटे दहा खेळाडूंसह खेळावे लागले.

मुंबई सिटीचे एका गुणामुळे एकूण 12 लढतीतून 18 गुण झाले. त्यांची ही तिसरी बरोबरी ठरली. हैदराबाद व केरळा ब्लास्टर्सपेक्षा मुंबई सिटीचे दोन गुण कमी आहेत. मुंबई सिटी (+2) व चेन्नईयीनचे (-2) समान गुण आहेत, गोलसरासरीत मुंबईच्या संघाला चौथा क्रमांक मिळाला. नॉर्थईस्टची ही स्पर्धेतील चौथी बरोबरी ठरली. त्यामुळे त्यांचे 14 लढतीतून 10 गुण झाले असून दहावा क्रमांक कायम आहे.

पेनल्टीवर मुंबईची आघाडी

मुंबई सिटीने अर्ध्या तासाच्या खेळात आघाडी घेतली. पेनल्टी फटका व्यवस्थित मारत मोरोक्कन अहमद जाहू याने गतविजेत्यांसाठी गोल केला. हा फटका देण्याचा निर्णय मात्र चर्चेचा विषय ठरला. मुंबई सिटीच्या विक्रम सिंग याला गोलक्षेत्रात नॉर्थईस्टच्या माशूर शरीफ याने पाडल्याच्या कारणास्तव रेफरी ए. रोवन यांनी पेनल्टी फटक्याची खूण केली. या निर्णयावर शरीफ, तसेच नॉर्थईस्ट युनायटेडचे खेळाडू खूष दिसले नाहीत. यावेळी टीव्ही रिप्लेत शरीफने विक्रमला पाडले नसल्याचे दिसले. जाहूने मोसमातील वैयक्तिक तिसरा गोल करताना गोलरक्षक सुभाशिष रॉय याला चकवत चेंडू नेटच्या डाव्या कोपऱ्यात मारला.

नॉर्थईस्टची बरोबरी

सामना संपण्यास अकरा मिनिटे बाकी असताना गुवाहाटीच्या संघाने बरोबरी साधली. कॉर्नरवर हर्नान सांतानाच्या असिस्टवर महंमद इर्शाद याने सणसणीत फटक्यावर मुंबई सिटीची आघाडी भेदली. 27 वर्षीय बचावपटू इर्शाद याचा आयएसएल स्पर्धेतील हा पहिलाच गोल ठरला. तो 73व्या मिनिटास मैदानात उतरला होता. त्यापूर्वी 58व्या मिनिटास मार्सेलिन्हो याचा फटका गोलपट्टीस आपल्यामुळे नॉर्थईस्टची संधी वाया गेली होती, तर 66व्या मिनिटासा सांतानाचा फ्रीकिक फटका मुंबई सिटीच्या गोलरक्षकाने अडविला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT