Navdeep Saini Dainik Gomantak
क्रीडा

नवदीप सैनी इंग्लिश कौंटीमध्ये 'या' संघाकडून खेळणार, राहुल द्रविडनंतर भारताचा दुसरा क्रिकेटर

भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने इंग्लिश कौंटी केंट सोबत करार केला आहे.

दैनिक गोमन्तक

भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने (Navdeep Saini) इंग्लिश कौंटी केंट सोबत करार केला आहे. या करारानंतर नवदीप आता चालू हंगामामध्ये केंटसाठी आठ सामने खेळणार आहे तर काऊंटीकडून खेळणारा सैनी हा राहुल द्रविडनंतरचा भारताचा दुसरा कसोटीपटू असणार आहे. तो 96 क्रमांकाचा शर्ट घालणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या बर्मिंगहॅम कसोटीपूर्वी तो नेट गोलंदाज म्हणून भारतीय संघासोबत दिसून आला होता. (Navdeep Saini will play for this team in the English county the second Indian cricketer after Rahul Dravid)

"केंट क्रिकेटला भारताचा आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला तीन काउंटी चॅम्पियनशिप सामने आणि पाच रॉयल लंडन कप सामन्यांसाठी करारबद्ध केल्याची घोषणा करताना आनंद होत आहे," केंट काउंटीने सोशल मीडियावर लिहिले आहे. तसेच नवदीप सैनी भारताकडून तिन्ही फॉरमॅट खेळला आहे. सैनीने ऑगस्ट 2019 मध्ये पदार्पण केले आहे.

नवदीप, भारतीय देशांतर्गत सर्किटमध्ये दिल्लीकडून खेळतो आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील राजस्थान रॉयल्स संघाचा तो भाग होता. जुलै 2021 मध्ये कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध टी-20 स्वरूपात भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नवदीप खेळला होता. तसेच नवदीप आता भारतासाठी दोन कसोटी, आठ वनडे आणि 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. नवदीपने 53 प्रथम श्रेणी सामन्यांच्या 91 डावांमध्ये 28.81 च्या सरासरीने 148 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये चार ते पाच विकेटचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mungul Firing Case: मुंगुल गोळीबार प्रकरणी गोवा पोलिसांची मोठी कारवाई, 7 अटकेत, 15 जणांविरोधात गुन्हा दाखल

Shubman Gill: गिलने रचला इतिहास! सलग चौथ्यांदा जिंकला ICC 'प्लेअर ऑफ द मंथ' अवॉर्ड; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू

Cricket News: क्रिडाविश्वात खळबळ, 34 वर्षीय स्टार खेळाडूनं सोडला देश, आता या' देशाकडून खेळणार क्रिकेट

Goa Crime: डॉक्टर निघाला ठग! 1.41 लाखांचे दागिने लंपास; 9 गुन्हे दाखल झालेला ऑर्थोपेडिक सर्जन अडकला

India Day Parade:न्यूयॉर्कमध्ये रश्मिका-विजयचा बोलबाला! 43व्या इंडिया डे परेडमध्ये 'Co-Grand Marshals' चा मान

SCROLL FOR NEXT