लॉर्ड्सवर धोनीच्या नावाचा गजर! चाहत्यांना आठवला 'माही भाई', Video Viral

लॉर्ड्स वनडेत भारतीय संघाला इंग्लंडकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
MS Dhoni
MS DhoniDainik Gomantak
Published on
Updated on

लॉर्ड्स वनडेत भारतीय संघाला (Team India) इंग्लंडकडून (England) दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाने 10 गडी राखून विजय मिळवला होता. त्याचवेळी दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला 100 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. (MS Dhoni name appeared at Lord The video going viral)

MS Dhoni
खतरनाक! चहलने केला खास विक्रम, सचिन तेंडुलकरच्या गोलंदाजीची केली बरोबरी

कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी फलंदाज शिखर धवन आणि फलंदाज विराट कोहली दुसऱ्या वनडे सामन्यात अपयशी ठरले. भारतीय संघाला निर्धारित 50 ओव्हरमध्ये 247 धावांचे लक्ष्य मिळाले, परंतु रीस टॉप्ली आणि डेव्हिड विली यांच्या गोलंदाजीमुळे भारताच्या 6 विकेट अवघ्या 102 धावांमध्येच पडल्या.

हा सामना पाहण्यासाठी BCCI अध्यक्ष सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी असे दिग्गज क्रिकेटपटू स्टेडियममध्ये पोहोचले होते. भारतीय संघ संकटात असताना महेंद्रसिंग धोनीचा फोटो पडद्यावर झळकला. धोनीचा हा फोटो काही सेकंदात सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. भारताचा सर्वोत्तम फिनिशर असलेल्या माहीची चाहत्यांना उणीव जाणवली त्यामुळे चाहत्यांनी लॉर्ड्सवर धोनीच्या नावाचा गजर झाला.

महेंद्रसिंग धोनीने (MS Donhi) भारतीय संघासाठी अनेक वर्षांपासून 'ट्रबलशूटर'ची भूमिका बजावली आहे. धोनी भारतातील सर्वोत्तम फिनिशर देखील ठरला आहे. टीम इंडियाला अडचणीत पाहून 'माही'चे चाहते धोनीला पॅड घालून मैदानात येण्याचा सल्ला देऊ लागले.

MS Dhoni
Shohidul Islam Suspended: ... म्हणुन शाहिदुल इस्लामला आयसीसीने 10 महिन्यांसाठी केले निलंबित

महेंद्रसिंग धोनीने भारतासाठी 350 वनडे सामन्यांमध्ये खेळला आहे. त्याच्या नावावर 84 वेळा नाबाद 10773 धावा देखील आहेत. लक्ष्याचा पाठलाग करत असताना धोनीचा विक्रम आणखी सरस ठरतो. माहीने 194 वनडेमध्ये दुसऱ्या डावात फलंदाजी देखील केली आहे.

2004 ते 2019 या काळात धोनीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 वेळा नाबाद असताना 51 च्या सरासरीने 4849 धावा केल्या आहेत तर नाबाद 183 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. जी धोनीने 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com