Mumbai Indians New Captain 2027 Dainik Gomantak
क्रीडा

कोण होणार मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन? रोहित, सूर्या की बुमराह? सायंकाळी 5.45 वाजता अधिकृत घोषणा, चाहते म्हणतायत 'मुंबईचा राजा'च पुन्हा गादीवर बसणार!

Mumbai Indians New Captain 2027: आयपीएल 2027 च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघात मोठे बदल पाहायला मिळत आहेत.

Sameer Amunekar

आयपीएल 2027 च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. खेळाडूंच्या ट्रेडिंगमुळे अनेक संघांची समीकरणे बदलली असून मुंबई इंडियन्सही नव्या रणनीतीसह मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. हार्दिक पंड्याने मुंबईची साथ सोडून पंजाब किंग्समध्ये प्रवेश केला आहे. त्याच्या बदल्यात पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग मुंबईच्या ताफ्यात दाखल झाला आहे. त्यामुळे आता सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती मुंबई इंडियन्सच्या नव्या कर्णधाराची. मुंबई इंडियन्स आज आपल्या नव्या कर्णधाराच्या नावाची अधिकृत घोषणा करणार आहे. सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी याबाबतची माहिती समोर येणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, पुन्हा एकदा रोहित शर्माकडे संघाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रोहित शर्माकडे पुन्हा कर्णधारपद जाणार?

मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून नव्या कर्णधाराच्या घोषणेची माहिती दिली आहे. यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबईचे नेतृत्व करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने तब्बल पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे त्याचा कर्णधार म्हणून असलेला अनुभव संघासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. दुसरीकडे, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मागील काही हंगामांत मुंबईला अपेक्षित यश मिळवता आले नाही. अलीकडेच मुंबईने कायरन पोलार्ड याच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन रोहितच्या नेतृत्वाखाली पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा विचार करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, अधिकृत घोषणा होईपर्यंत कर्णधारपदाबाबत निश्चित माहिती समोर आलेली नाही.

हार्दिक पंड्याची मुंबईला सोडचिठ्ठी

हार्दिक पंड्या मागील तीन वर्षांपासून मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत होता. मात्र, त्याच्या कर्णधारपदाच्या काळात संघाला सातत्यपूर्ण यश मिळवता आले नाही. संघाच्या कामगिरीसोबतच मैदानावरील आणि संघातील वातावरणाबाबतही अनेक चर्चा झाल्या होत्या. त्यामुळे आगामी हंगामापूर्वी हार्दिक मुंबईपासून वेगळा होणार असल्याच्या बातम्यांना वेग आला होता.

त्याच्या पुढील संघाबाबत चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्ससारख्या संघांची नावे चर्चेत होती. अखेर ट्रेडिंग प्रक्रियेतून हार्दिक पंजाब किंग्समध्ये दाखल झाला. त्याच्या बदल्यात पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्समध्ये आला. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजीला नवे बळ मिळण्याची अपेक्षा आहे.

पंजाबमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणार हार्दिक

मुंबई इंडियन्समधून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पंड्या आता पंजाब किंग्सकडून खेळताना दिसणार आहे. मात्र, त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी असणार नसल्याची माहिती आहे. पंजाबचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे असल्याने हार्दिक त्याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.

दरम्यान, आयपीएल 2027 साठी 16 डिसेंबरला खेळाडूंचा लिलाव होणार आहे. त्यापूर्वी मुंबई इंडियन्सने कर्णधाराची घोषणा करण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. रोहित शर्माला पुन्हा नेतृत्वाची संधी मिळते की मुंबई व्यवस्थापन एखाद्या नव्या चेहऱ्यावर विश्वास दाखवते, हे आजच्या घोषणेनंतर स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेसचे 'घर-घर चलो अभियान', मडगावातील संविधान बचाव सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

खरी कुजबुज: मुख्यमंत्री अन् गोमंतकीय वारसा

AI Education: विद्यार्थ्यांसाठी एआयचा नवा मंच! 'आयाम क्लब'मधून 12 सर्जनशील कौशल्यांचे प्रशिक्षण

VIDEO: ऑटोग्राफ देण्यासाठी गेला अन्... चाहत्यांनी थेट कृणाल पांड्याच्या अंगावर भिरकावला बूट; थोडक्यात बचावला, पाहा व्हायरल व्हिडिओ

Ro Ro Ferry Boat: गोव्यात निवडणुकीपूर्वी 2 नव्या रो-रो फेरीबोटी सेवेत; वॉटर मेट्रोचे काय?

SCROLL FOR NEXT