Goa Politics: काँग्रेसचे 'घर-घर चलो अभियान', मडगावातील संविधान बचाव सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Congress Goa Alliance Announcement: कॉंग्रेस, गोवा फॉरवर्ड व रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष यांची युती निश्चित झाली असून बोलणी अंतिम टप्प्यात आहे.
Congress Goa Alliance Announcement
Goa PoliticsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

सासष्टी: कॉंग्रेस, गोवा फॉरवर्ड व रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष यांची युती निश्चित झाली असून बोलणी अंतिम टप्प्यात आहे. येत्या आठ दिवसांत युतीची जाहीर घोषणा करून प्रचाराला सुरुवात केली जाईल. केवळ जागावाटपाचा मुद्दा बाकी असून तो सामोपचाराने सोडवला जाईल, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.

नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठींनी युतीला हिरवा कंदील दाखवला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणूक ही विरोधी पक्षांसाठी शेवटची संधी असून आम्ही कुठलाही त्याग करण्यास तयार असल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी ठणकावून सांगितले. मडगावातील लोहिया मैदानावर आज कॉंग्रेस पक्षातर्फे संविधान बचाव सभेचे आयोजन केले होते. या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Congress Goa Alliance Announcement
Goa Politics: काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजीची युती पक्की! 8 दिवसांत अधिकृत घोषणा; जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात, चोडणकरांची माहिती

उद्यापासून पक्षातर्फे घर-घर चलो अभियानाला सुरुवात केली जाणार असून पक्षाचे खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक घरात जाऊन भाजपने १५ वर्षांत जे गंभीर प्रश्न निर्माण केले त्याची माहिती देतील, असे चोडणकर यांनी सांगितले. या सभेला गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, डॉ. अंजली निंबाळकर, यशोमती ठाकूर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्ता, प्रदेश समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गद्दारांना धडा शिकवा : ठाकरे

कॉंग्रेसमध्ये जे गद्दार होते, ते गेल्याने पक्ष स्वच्छ झाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पक्ष वेगळे धोरण घेऊन उतरणार आहे, असे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. जे गद्दार पुन्हा निवडणूक लढवतील, त्यांना गोमंतकीयांनी योग्य धडा शिकवावा. यापुढे कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून येऊन कोणीही पक्षांतर करणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. जो पक्षांतर करेल त्याला लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. कॉंग्रेस पक्ष योग्य उमेदवारांची छाननी करून निवड करणार आहे. निवडून येणारे पक्षांतर करणार नाहीत यासाठी पक्षाने योजना तयार केल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

Congress Goa Alliance Announcement
Goa Politics: गोवा फॉरवर्डसोबत युतीच्या चर्चेला दिल्‍लीत सकारात्मक वळण, काँग्रेसचा सावध आशावाद; पुढील बैठक निर्णायक

६० हजार नावे मतदार यादीत घुसविण्याचा डाव

आगामी निवडणुकीत धोका संभवत असल्याने महाराष्ट्र व कर्नाटकमधील सुमारे ६० हजार लोकांची नावे मतदार यादीत घुसविण्याचा भाजपचा डाव आहे. ज्या मतदारसंघात त्यांना पराभवाची भीती जाणवते, तेथे ते चार ते पाच हजार स्थलांतरित मतदार घुसविण्याची शक्यता आहे, असा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला. त्यासाठी सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. अशा गोष्टी आम्ही कदापि होऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Political Alliance
Sparrow Conservation
Goa Police Action Against Touts
Goa Ujjwala Scheme