

नवी दिल्ली: आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने गोवा फॉरवर्डसोबत सावधपणे युतीची चर्चा करण्यावर भर दिला आहे. मंगळवारी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) के. सी. वेणुगोपाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत युतीच्या चर्चेची सुरुवात चांगली झाली असल्याचे गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.
तथापि, २०१७ मध्ये मनोहर पर्रीकरांना पाठिंबा देण्याच्या ‘फॉरवर्ड’ भूमिकेमुळे संभाव्य युतीविषयी काँग्रेसने सावध आशावाद बाळगला आहे. अर्थात, अलीकडच्या काळात काँग्रेस - गोवा फॉरवर्डमध्ये एकमेकांप्रति वाढलेला विश्वास ही उभय पक्षांसाठी जमेची बाजू ठरणार आहे. त्यामुळे प्रारंभीच्या सकारात्मक बोलणीनंतर पुढच्या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब करण्यावर भर असेल, असे काँग्रेस सूत्रांचे म्हणणे आहे.
सकारात्मक सुरुवात : ठाकरे
आगामी विधानसभा निवडणुकीत गोव्याच्या जनतेचा ‘मूड’ भाजपला सत्तेतून बाहेर करण्याचा असून, त्यासाठी सर्व समविचारी व भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने गोवा फॉरवर्ड व रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षासोबत युतीची चर्चा सकारात्मक दिशेने सुरू असल्याचे गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.