

पणजी: वॉटर मेट्रो प्रकल्प हा दीर्घकालीन उपक्रम असून, २०२७ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी तो पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी दोन अतिरिक्त ‘रो-रो’ फेरीबोटींची सेवा सुरू होईल, असे नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. पर्वरी येथील मंत्रालयातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
वॉटर मेट्रो प्रकल्पासंदर्भातील अनेक बाबींची पूर्तता होणे बाकी असल्याने हा प्रकल्प निवडणुकीपूर्वी पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, दोन नव्या ‘रो-रो’ फेरीबोटी सेवेत दाखल करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारने यापूर्वीच रायबंदर-चोडण मार्गावर रो-रो फेरीबोट सेवा सुरू केली असून, तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अन्य मार्गांवरही ही सेवा सुरू करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार, सा-पेंद्र ते दिवाडी हा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यातील म्हादईच्या खोऱ्यात आढळलेल्या पट्टेरी वाघाबाबत विचारले असता, फळदेसाई यांनी बोलणे टाळले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.