Mohammad Amir on Abhishek Sharma Dainik Gomantak
क्रीडा

अभिषेकच्या 'पॉवर हिटिंग'वर पाकडे जळतात, माजी गोलंदाज बरळला, म्हणाला, "त्याला डिफेन्स ठाऊकच नाही"

Mohammad Amir: टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा अद्याप एकाही धावेसाठी झगडत असताना, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने पुन्हा एकदा विष ओकले आहे.

Sameer Amunekar

टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा अद्याप एकाही धावेसाठी झगडत असताना, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने पुन्हा एकदा विष ओकले आहे. अभिषेकच्या खराब फॉर्मचा फायदा घेत आमीरने केवळ या युवा खेळाडूवरच नव्हे, तर संपूर्ण भारतीय संघाच्या विश्वचषकातील भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'स्वस्त प्रसिद्धी' मिळवण्यासाठी आमीरने टीम इंडियाबद्दल केलेले विधान सध्या भारतीय चाहत्यांच्या संतापाचे कारण ठरत आहे.

आमीरची बोचरी टीका

एका पाकिस्तानी टीव्ही शोमध्ये बोलताना मोहम्मद आमीरने अभिषेक शर्माला पुन्हा एकदा टार्गेट केले. यापूर्वी अभिषेकला 'स्लॉगर' (केवळ बॅट फिरवणारा) म्हणणाऱ्या आमीरने आता त्याच्या बचावात्मक तंत्रावर बोट ठेवले आहे. आमीर म्हणाला, "अभिषेक शर्माकडे डिफेन्सिव्ह गेम नावाचा प्रकारच नाही. जो खेळाडू चेंडू रोखू शकत नाही किंवा रेषेत येऊन बचाव करू शकत नाही, त्याला फलंदाज तरी कसे म्हणायचे? तो केवळ मोठे फटके मारण्याच्या नादात आपली विकेट फेकून देत आहे." आमीरच्या या विधानामुळे अभिषेकच्या चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

भारत सेमीफायनल गाठणार नाही? आमीरचे धक्कादायक भाकीत

केवळ खेळाडूवर टीका करून आमीर थांबला नाही, तर त्याने टीम इंडियाच्या 'सुपर-८' मधील प्रवासावरही भाष्य केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारत पराभूत होईल, असे भाकीत आमीरने वर्तवले आहे. तो म्हणाला, "सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका ज्या पद्धतीचे क्रिकेट खेळत आहेत, ते पाहता आफ्रिकन संघ भारतापेक्षा सरस वाटतोय. मला वाटत नाही की टीम इंडिया सेमीफायनलपर्यंत मजल मारू शकेल." आमीरचे हे विधान भारतीय संघाला कमी लेखण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

अभिषेकचा 'रुद्रावतार' कायम

एकीकडे आमीर टीका करत असताना दुसरीकडे अभिषेक शर्माने आपल्या टीकाकारांना कृतीतून उत्तर देण्याचे ठरवले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी अभिषेकने स्पष्ट केले आहे की, तो आपला आक्रमक खेळ बदलणार नाही. "मी माझ्या फलंदाजीचा आनंद घेतो आणि मला निकालांची चिंता नाही. मी माझ्या नैसर्गिक अंदाजातच खेळणे सुरू ठेवेन," असे अभिषेकने ठणकावून सांगितले आहे. आता अहमदाबादच्या मैदानात अभिषेक आमीरच्या टीकेला आपल्या बॅटने कसे चोख उत्तर देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA Premier League: धेंपो क्लबची अर्धी मोहीम फत्ते, 'चौगुले'विरुद्ध 646 धावांचा डोंगर; स्नेहलचे द्विशतक, जीवनचे शतक

VIDEO: वैमानिकाची एक चूक अन् 8 प्रवाशांचा खेळ खल्लास, 5 मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं; इंडोनेशियातील बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर क्रॅश

Watch Video: अय्यरच्या 'सुपरमॅन' अवतारावर रोहित-सूर्याचे विस्फारले डोळे, चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; श्रेयसचा धडाकेबाज कॅच व्हायरल

Omkar Elephant: 'ओंकार'चा उगवे भागात धुमाकूळ, संतप्त नागरिकांकडून सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा

Cavelossim Assolna bridge: केळशी-असोळणा पुलाची धोकादायक फट बुजवली, वॉरन यांनी वेधले लक्ष; 4 तासांत रस्‍त्‍याची दुरुस्‍ती

SCROLL FOR NEXT