

पणजी: विशेष सखोल फेरतपासणीची (एसआयआर) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदारयादीतून १ लाख २७ हजार ४६८ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. यात सर्वाधिक ११,६५७ मतदार मुरगाव मतदारसंघातील तर सर्वांत कमी ८२० मतदार सांगे मतदारसंघातील आहेत.
अंतिम मतदारयादीत १० लाख ५७ हजार ५६६ मतदारांची नावे समाविष्ट आहेत. मतदारयादीतून नावे वगळलेल्यांना पुढील १५ दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयात हरकतींसाठी अर्ज सादर करता येतील, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. संजय गोयल यांनी दिली. मुख्य निवडणूक आयोगाच्या आल्तिनो येथील मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यात ‘एसआयआर’ची प्रक्रिया २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरू झाली होती. त्यावेळी मतदारयादीत ११,८५,०३४ मतदारांची नावे होती. १६ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या मसुदा यादीतून मृत, अनुपस्थित, दुहेरी नाव असलेले तसेच कायमचा पत्ता बदललेल्या १,००,०४२ मतदारांची नावे वगळली.
त्यावेळच्या मसुदा यादीत ९,०२,५८९ मॅप झालेले, तर १,८२,४०३ मॅप न झालेले असे एकूण १०,८४,९९२ मतदार होते. ज्या मतदारांचे मॅपिंग झालेले नव्हते, त्यांना नोटिसा पाठवून त्यांच्या सुनावण्या घेण्यात आल्या. मॅप झालेल्यांपैकी ५८,९२३ मतदारांच्या माहितीत अनियमितता दिसून आल्याने त्यांनाही नोटिसा जारी केल्या होत्या.
त्यांच्या सुनावणीनंतर ३८,७८० मतदार अपात्र ठरविले. मसुदा यादी प्रसिद्ध झाल्यानंतर १२,१६६ नवीन मतदारांचा अंतिम यादीत समावेश केला असून, ३९,५९२ नावे वगळली, असे गोयल यांनी सांगितले. दरम्यान, अंतिम मतदारयादीत ज्या १०,५७,५६६ मतदारांची नावे समाविष्ट आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.