Watch Video: अय्यरच्या 'सुपरमॅन' अवतारावर रोहित-सूर्याचे विस्फारले डोळे, चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; श्रेयसचा धडाकेबाज कॅच व्हायरल

Shreyas Iyer Superman Catch: पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने सीमा रेषेवर दाखवलेली चपळाई आणि 'सुपरमॅन' फिल्डिंगमुळे मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याला तंबूत परतावे लागले.
Shreyas Iyer Best Catch
Shreyas IyerDainik Gomantak
Published on
Updated on

Shreyas Iyer Superman Catch: आयपीएल 2026 च्या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स समोरासमोर आले असताना, मैदानावर एका अशा घटनेने चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले ज्याची चर्चा आता जगभरात होत आहे. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने सीमा रेषेवर दाखवलेली चपळाई आणि 'सुपरमॅन' फिल्डिंगमुळे मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याला तंबूत परतावे लागले. अय्यरच्या या चित्तथरारक फिल्डिंगचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असून डगआऊटमध्ये बसलेल्या रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या प्रतिक्रिया या कॅचची भीषणता सांगण्यासाठी पुरेशा होत्या.

सामन्याचे 18 वे षटक मार्को यान्सन टाकत होता. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हार्दिक पांड्याने लॉंग ऑनच्या दिशेने एक उत्तुंग शॉट खेळला. चेंडू हवेत असताना तो षटकार जाईल असेच वाटत होते, पण तिथे अय्यर उभा होता. अय्यरने हवेत झेप घेत बाउंड्रीच्या बाहेर जाणारा चेंडू अतिशय चतुराईने सीमारेषेच्या आत फेकला. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या जेवियर बार्टलेटने तो झेल पूर्ण केला. तांत्रिकदृष्ट्या हा झेल बार्टलेटच्या नावावर असला तरी, याचे पूर्ण श्रेय श्रेयस अय्यरच्या त्या अफाट फिल्डिंगला जाते. हार्दिक पांड्या बाद झाल्याचे पाहून मुंबईच्या गोटात स्मशानशांतता पसरली, तर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिले.

Shreyas Iyer Best Catch
Goa IPL Betting Racket: गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त, सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा; 6 जणांना रंगेहाथ पकडलं VIDEO

या सामन्यात मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) सुरुवात अत्यंत खराब झाली होती. डावाच्या दुसऱ्याच षटकात अर्शदीप सिंगने रियान रिकलटन आणि सूर्यकुमार यादव या दोघांनाही तंबूत धाडून मुंबईला बॅकफूटवर नेले होते. मात्र, त्यानंतर सलामीवीर क्विंटन डी कॉक याने एकतर्फी झुंज देत पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. डी कॉकने अवघ्या 60 चेंडूंमध्ये 112 धावांची धडाकेबाज नाबाद शतकी खेळी खेळली. त्याच्या या खेळीत 8 चौकार आणि 7 गगनभेदी षटकारांचा समावेश होता. त्याला मधल्या फळीत नमनधीरने 31 चेंडूत 50 धावा करुन मोलाची साथ दिली.

Shreyas Iyer Best Catch
IPL 2026 Points Table: लखनौ 'फ्लॉप', आरसीबी 'टॉप'! गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर कब्जा; टॉप-5 मध्ये मोठी उलथापालथ

श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) त्या एका कॅचने सामन्याचे चित्र पालटले आणि मुंबईच्या धावसंख्येला ब्रेक लावला. हार्दिक पांड्या मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जात असताना अय्यरने त्याला रोखले. श्रेयस अय्यरच्या या जबरदस्त फिल्डिंगचे कौतुक करताना नेटकरी थकत नाहीत, तर दुसरीकडे मुंबईच्या डगआऊटमधील रोहित आणि सूर्याचे व्हायरल झालेले रिअ‍ॅक्शन या सामन्याचा सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा ठरले आहेत. अय्यरने ज्या पद्धतीने या कॅचनंतर जल्लोष केला, त्यावरुन त्याची आक्रमकता आणि खेळाप्रती असलेली निष्ठा पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com