VIDEO: वैमानिकाची एक चूक अन् 8 प्रवाशांचा खेळ खल्लास, 5 मिनिटांतच होत्याचं नव्हतं झालं; इंडोनेशियातील बोर्नियो बेटावर हेलिकॉप्टर क्रॅश

8 Killed in Borneo Helicopter Accident: इंडोनेशियाच्या बोर्नियो बेटावरुन एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली. गेल्या 24 तासांपासून रडारवरुन बेपत्ता असलेल्या एका हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाल्याचे स्पष्ट झाले.
Helicopter Crash Indonesia
Indonesia Helicopter Crash BorneoDainik Gomantak
Published on
Updated on

Indonesia Helicopter Crash Borneo: इंडोनेशियाच्या बोर्नियो बेटावरुन एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली. गेल्या 24 तासांपासून रडारवरुन बेपत्ता असलेल्या एका हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाल्याचे स्पष्ट झाले असून या दुर्घटनेत 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. हे हेलिकॉप्टर घनदाट जंगलात कोसळल्याने त्याचे अक्षरशः तुकडे झाले असून घटनास्थळाचा समोर आलेला व्हिडिओ अत्यंत भीषण आहे.

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर बोर्नियो बेटावरील ताडाच्या मोठ्या बागांच्या वरुन उड्डाण करत असताना हा अपघात घडला. रडारशी संपर्क तुटल्यानंतर तातडीने शोधमोहीम राबवण्यात आली होती, ज्यामध्ये अखेर या हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले.

Helicopter Crash Indonesia
Indonesia Landslide: रात्री गाढ झोपेत असताना 'काळ' आला! इंडोनेशियात भूस्खलनात 21 जणांचा मृत्यू; 80 हून अधिक बेपत्ता VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर 'पीटी मैथ्यू एयर नुसंतारा' या कंपनीच्या मालकीचे असून त्याची ओळख 'एअरबस एच 130' अशी पटली. या अपघाताचे सर्वात धक्कादायक कारण म्हणजे तांत्रिक बिघाड असतानाही केलेले उड्डाण. 'सीएनएन इंडोनेशिया'च्या वृत्तानुसार, हेलिकॉप्टरने उड्डाण घेण्यापूर्वी 45 मिनिटे तयारी सुरु होती. उड्डाणासाठी सज्ज होत असतानाच त्यात काही तांत्रिक तक्रारी जाणवल्या होत्या. मात्र, या तक्रारींकडे दुर्लक्ष करुन वैमानिकांनी ते हवेत उडवले. उड्डाण केल्यानंतर अवघ्या 5 मिनिटांतच हेलिकॉप्टरचा रडारशी संपर्क तुटला आणि काही वेळातच ते डोंगराळ भागात कोसळले. तांत्रिक बिघाड माहीत असूनही उड्डाण घेण्याचा निर्णय 8 जणांच्या जीवावर बेतला.

Helicopter Crash Indonesia
Indonesia Mosque Blast: जकार्ता हादरले! मशिदीत मोठा स्फोट, 50 हून अधिक जखमी; संशयास्पद वस्तू सापडल्याने वाढली चिंता VIDEO

हा अपघात (Accident) ज्या भागात झाला, तो परिसर अत्यंत दुर्गम आणि डोंगराळ आहे. सेकाडाऊ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगराळ भागामुळे तिथे मदत आणि बचाव कार्य राबवणे अत्यंत कठीण जात होते. तरीही प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करुन 8 मृतदेह बाहेर काढले. या मृतांमध्ये 7 जण हे इंडोनेशियाचे स्थानिक नागरिक आहेत, तर एका व्यक्तीची ओळख मलेशियन नागरिक म्हणून पटली. हेलिकॉप्टर नेमके कुठे जात होते, याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, या घटनेमुळे इंडोनेशियातील हवाई सुरक्षेच्या नियमांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

Helicopter Crash Indonesia
Indonesia: इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर मुसळधार पावसानंतर भूस्खलन; 19 जणांचा मृत्यू तर अनेक बेपत्ता

सध्या घटनास्थळी सरकारकडून मदत कार्य वेगाने सुरु असून तांत्रिक बिघाडाची माहिती असतानाही उड्डाण का केले गेले, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जंगलातील ताडाच्या बागांमध्ये विखुरलेले हेलिकॉप्टरचे (Helicopter) अवशेष या भीषण दुर्घटनेची साक्ष देत आहेत. मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी हवाई वाहतुकीच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com