

वाळपई: गोमंतक सह्याद्रीचा मेरुमणी म्हणून ओळखला जाणारा सत्तरीतील सोनसोगर हा समुद्रसपाटीपासून सुमारे ११६६ मीटर उंचीवर वसलेला आहे. अनुभवी गिर्यारोहकांसाठीही आव्हानात्मक मानले जाणारे हे सर्वोच्च शिखर सहा वर्षांच्या चिमुकलीने सर करत नवा विक्रम रचला आहे. कोल्हापूरच्या रांगड्या मातीत वाढलेली अन्वी अनिता चेतन घाटगे हिने अवघ्या सात तासांत हे शिखर पादाक्रांत करून इतिहास घडवला. इतक्या लहान वयात हा गड सर करणारी ती पहिलीच गिर्यारोहक ठरली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत १९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता अन्वीने चढाईला सुरुवात केली. घनदाट जंगलातून पूर्वनियोजित वाट नसताना मार्ग काढत, तीन वेळा नदी पार करत आणि तब्बल ४५ अंश उतार असलेल्या तीव्र कड्यावरून साहसी चढाई करत ती दुपारी अंदाजे १.१५ वाजता (सुमारे ६ तास ४५ मिनिटांत) शिखरावर पोहोचली. शिखर सर करताच अन्वीने शिवध्वज फडकावून जोरदार शिवगर्जना दिली.
वन विभागाची परवानगी व गौरव
सोसोगड शिखर म्हादई वन्यजीव अभयारण्यात येत असल्याने वन विभागाच्या विशेष परवानगीने ही मोहीम पार पडली. शिखर अत्यंत धोकादायक असल्याने तिच्या सुरक्षेसाठी ११ फॉरेस्ट गार्डची नियुक्ती करण्यात आली होती. तिच्या या यशाबद्दल उपवनसंरक्षक जिस्स वर्के (आयएफएस) यांनी प्रमाणपत्र देऊन अन्वीचा गौरव केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.