Mitchell Starc - Virat Kohli X
क्रीडा

World Cup 2023: 'पुढचा वर्ल्डकप खेळणार नाही, पण निवृत्तीही घेत नाहीये', दिग्गज क्रिकेटरचं मोठं वक्तव्य

Mitchell Starc: वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील सेमीफायनलपूर्वी दिग्गज क्रिकेटरने निवृत्तीबाबत भाष्य केले आहे.

Pranali Kodre

Mitchell Starc on ODI Cricket Career ahead of World Cup 2023:

क्रिकेट वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील साखळी फेरी संपली आहे. आता बुधवारी आणि गुरुवारी उपांत्य फेरी खेळली जाणार आहे. दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघात खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने मोठे भाष्य केले आहे.

33 वर्षीय स्टार्कने तो पुढील वर्ल्डकप म्हणजे दक्षिण आफ्रिकेमध्ये होणारा 2027 सालचा वर्ल्डकप खेळणार नाही. मात्र, तो लगेच वनडेतून निवृत्तीचाही विचार करत नसल्याचे त्याने सांगितले.

स्टार्कने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाला 2015 वनडे वर्ल्डकप आणि 2021 टी20 वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. मात्र, यंदाच्या वर्ल्डकपमध्ये त्याची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. त्याने 43.90 च्या सरासरीने 10 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, त्याने उपांत्य फेरीपूर्वी पत्रकारांना निवृत्तीबाबत सांगितले की 'मी यानंतरही खेळत राहण्यास उत्सुक आहे. पण मला यात काहीच शंका नाही की मी पुढचा वर्ल्डकप खेळणार नाही. माझे तसे काहीच लक्ष्य नाही. 4 वर्षे हा अजून बराच काळ आहे.'

तसेच पुढीलवर्षी टी20 वर्ल्डकप होणार आहे. पण स्टार्कने म्हटले आहे की त्याचे लक्ष्य कसोटी क्रिकेटकडे अधिक आहे.

तो म्हणाला, 'मी नेहमीच कसोटीला सर्व क्रिकेट प्रकारात वरती ठेवले आहे. मी कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी बाकी सर्व सोडेल. माझ्यासाठी वर्ल्डकपचा उपांत्य सामना हा नेहमीसारखाच ऑस्ट्रेलियासाठी एक वनडे सामना असणार आहे. माझ्यासाठी अजूनही वनडे क्रिकेटमधील माझ्या रस्ता संपलेला नाही.'

याशिवाय त्याच्या निराशाजनक कामगिरीबद्दलही त्याने भाष्य केले. तो म्हणाला, 'माझ्या अपेक्षेप्रमाणे मी कामगिरी केलेली नाही. गेल्या दोन वर्ल्डकपमध्ये माझी चांगली कामगिरी झालेली नाही. पण आता अखेरीस पुन्हा प्रभाव पाडण्याची संधी मिळाली आहे.'

'निश्चितच विशिष्ट खेळपट्टीवर प्रथम गोलंदाजी करणे, तेही नवीन चेंडूवर दोनच क्षेत्ररक्षक बाहेर असताना, हा सर्वात गोलंदाजीसाठी कठीण काळ असतो. सामना पुढे जातो, तसा खेळपट्टीचा अंदाज येतो. ही काही वाईट गोष्ट नाही, हेच वनडे क्रिकेट आहे.'

'जर या वर्ल्डकपमध्ये धावांकडे पाहिले किंवा शतकांकडे पाहिले आणि ५ विकेट्स कितीदा घेतले गेले, तर पाटा खेळपट्टीवर दोन नवीन चेंडू घेऊन खेळणे है वैशिष्ट्य राहिले आहे. गोलंदाजांना विकेट घेण्यासाठी मार्ग शोधावा लागत आहे.'

स्टार्कने 119 वनडे सामने आत्तापर्यंत खेळले असून 230 विकेट्स घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडाामोडी

IFFI Goa 2024: यंदाचा इफ्फी सोहळा दणक्यात! मडगाव आणि फोंड्यात लागणार सहा एक्स्ट्रा स्क्रीन्स

Government Job Scam: सरकारी नोकरीचे 'मायाजाल'! वेतन, ऐषोरामाचे आकर्षण; 'रोखी'मुळे होणारा मनस्ताप

SCROLL FOR NEXT