World Cup 2023: पाकिस्तानात पोहोचताच संघात उडाली खळबळ! 'या' दिग्गजाने दिला आपल्या पदाचा राजीनामा

Pakistan Cricket Team: एकदिवसीय विश्वचषक 2023 पाकिस्तान संघासाठी खूप वाईट गेला. यावेळीही त्यांना उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले.
Morne Morkel
Morne Morkel Twitter / @TheRealPCBMedia
Published on
Updated on

Pakistan Cricket Team: एकदिवसीय विश्वचषक 2023 पाकिस्तान संघासाठी खूप वाईट गेला. यावेळीही त्यांना उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली, संघाने 9 पैकी केवळ 4 सामने जिंकले आणि स्पर्धेतून आऊट झाले.

स्पर्धेतून आऊट झाल्यानंतर पाकिस्तान संघ मायदेशी परतला. पाकिस्तानात पोहोचताच संघातील एका अनुभवी खेळाडूने मोठा निर्णय घेतला आहे. या दिग्गजाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

या दिग्गजाने राजीनामा दिला

दरम्यान, पाकिस्तान (Pakistan) संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केल याने आपल्या पदाचा राजीनामा दिला. यावेळी विश्वचषकात पाकिस्तानी गोलंदाजांची अवस्था खूपच वाईट होती आणि तेच पराभवाचे सर्वात मोठे कारण ठरले.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात पीसीबीने एक प्रसिद्धीपत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्केलने या वर्षी जूनमध्ये या पदाची सूत्रे हाती घेतली होती. त्याचा पाकिस्तान संघाशी 6 महिन्यांचा करार होता.

Morne Morkel
World Cup 2023: श्रेयस-केएल राहुलचा शतकी दणका, तर चौघांची फिफ्टी! भारताचे नेदरलँड्सला 411 धावांचे लक्ष्य

नवीन गोलंदाजी प्रशिक्षक कधी जाहीर होणार?

मॉर्ने मॉर्केलच्या जागी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अद्याप घोषणा केलेली नाही. योग्य वेळी त्याच्या बदलीची घोषणा करणार असल्याचे बोर्डाने म्हटले आहे. आता येत्या काही दिवसांत पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये आणखी काही बदल दिसू शकतात.

आता पाकिस्तान क्रिकेट संघाला आपली पुढील मालिका ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळायची आहे. 14 डिसेंबरपासून हा दौरा होणार आहे. या कालावधीत पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. अशा परिस्थितीत या मालिकेपूर्वी नव्या गोलंदाजी प्रशिक्षकाबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

Morne Morkel
World Cup 2023: सेमीफायनल पूर्वीचा शेवटचा सामना, रोहित शर्मा करणार का प्लेइंग 11 मध्ये बदल?

या गोलंदाजांनी अत्यंत खराब कामगिरी केली

सध्या पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस राऊफसाठी ही स्पर्धा सर्वात वाईट होती. विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा देण्याचा लाजिरवाणा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला. यंदाच्या विश्वचषकात 9 सामने खेळताना हारिस राऊफने 533 धावा दिल्या. त्याचवेळी, शाहीन आफ्रिदीही पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याने 481 धावा दिल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com