Kraigg Brathwaite Dainik Gomantak
क्रीडा

WI vs IND: भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी वेस्ट इंडिजच्या कर्णधाराचं मोठं वक्तव्य, म्हणाला...

IND vs WI, 1st Test: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 12 जुलैपासून सुरु होत आहे.

Manish Jadhav

IND vs WI, 1st Test: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 12 जुलैपासून सुरु होत आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना 12 जुलैपासून डॉमिनिका येथे खेळवला जाणार आहे.

हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटच्या वक्तव्याने दहशत निर्माण केली आहे.

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी वेस्ट इंडिजच्या कर्णधाराचं मोठं वक्तव्य

दरम्यान, 12 जुलैपासून भारताविरुद्ध सुरु होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत मानसिक तयारी आणि रणनीतीची अंमलबजावणी हे कौशल्य यशाची गुरुकिल्ली ठरेल, असा विश्वास वेस्ट इंडिजचा (West Indies) कसोटी कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने व्यक्त केला आहे. दोन वेळचा चॅम्पियन वेस्ट इंडिजचा संघ या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरु शकला नाही.

त्याच्या एका विधानाने वादळ निर्माण केले

क्रेग ब्रॅथवेट आणि त्याचा संघ मात्र भारताविरुद्ध (India) आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या नवीन हंगामाची सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहे. वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू सध्या कुलीज क्रिकेट मैदानावर तयारी करत आहेत.

वेस्ट इंडिज क्रिकेटने ब्रेथवेटचा हवाला देत म्हटले की, “चांगली सुरुवात करणे महत्त्वाचे आहे. आम्ही भारताविरुद्ध खेळणार आहोत आणि प्रत्येकजण त्याची आतुरतेने वाट पाहत आहे.''

12 जुलैपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे

ब्रेथवेट पुढे म्हणाला की, 'एक संघ, फलंदाज आणि गोलंदाज या नात्याने आम्हाला काय अपेक्षित आहे हे माहीत आहे आणि त्यासाठी तयारी खूप महत्त्वाची आहे. आम्हाला भारतीय संघ आणि येथील परिस्थितीची माहिती आहे, त्यामुळे मानसिक तयारी खूप महत्त्वाची आहे. आम्हाला एक अचूक रणनीती बनवावी लागेल आणि ती अंमलात आणावी लागेल.'

ब्रेथवेटने कॅरेबियन क्रिकेटप्रेमींना संघाला चेअर करण्यासाठी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहन केले. तो म्हणाला की, “पहिली कसोटी डॉमिनिका येथे होणार आहे आणि आमचे चाहते मोठ्या संख्येने यावेत अशी आमची इच्छा आहे.”

दुसरी कसोटी 20 जुलैपासून त्रिनिदाद येथे होणार आहे. यानंतर 27 जुलैपासून तीन एकदिवसीय सामने आणि 3 ऑगस्टपासून पाच टी-20 सामने खेळवले जातील.

भारताचा टेस्ट संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, पटेल, रवींद्र जडेजा. मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिका सामने (भारतीय वेळ)

पहिली कसोटी, 12-16 जुलै, डॉमिनिका, संध्याकाळी 7.30 वा

दुसरी कसोटी, 20-24 जुलै, संध्याकाळी 7.30 वाजता, त्रिनिदाद

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिका

पहिली वनडे, 27 जुलै, संध्याकाळी 7.00 वाजता, बार्बाडोस

दुसरी वनडे, 29 जुलै, संध्याकाळी 7.00 वाजता, बार्बाडोस

तिसरी एकदिवसीय, 1 ऑगस्ट, संध्याकाळी 7.00 वाजता, त्रिनिदाद

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज T20 मालिका

पहिला T20 सामना, 3 ऑगस्ट, रात्री 8.00 वाजता, त्रिनिदाद

दुसरा T20 सामना, 6 ऑगस्ट, रात्री 8.00 वाजता, गुयाना

तिसरा T20 सामना, 8 ऑगस्ट, रात्री 8.00 वाजता, गुयाना

चौथा T20 सामना, 12 ऑगस्ट, रात्री 8.00 वाजता, फ्लोरिडा

पाचवा T20 सामना, 13 ऑगस्ट, रात्री 8.00 वाजता, फ्लोरिडा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Old Buses in Goa: प्रवाशांचा जीव टांगणीला! गोव्याच्या रस्त्यांवर 779 'कालबाह्य' बसचा प्रवास सुरुच; प्रदूषणाचे नियम धाब्यावर

BCCI Central Contracts: रोहित-विराटचं होणार 'डिमोशन'? BCC लवकरच घेणार मोठा निर्णय; जडेजा अन् बुमराहालाही फटका

Feista Do Pavo: ..लोकांचा, लोकांद्वारे आणि लोकांसाठी असणारा ‘फेस्ता दो पावो’

Tourist Safety: पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गोवा सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; हॉटेल नोंदणीचे नियम बदलले! आता 'Fire NOC' बंधनकारक

VIDEO: महिलांशी अश्लील चाळे करणाऱ्या 'DGP'वर निलंबनाची कारवाई, Viral व्हिडिओनंतर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT