IND vs WI, 1st Test: कसोटी मालिकेत 'हा' पराक्रम करुन किंग कोहली रचणार इतिहास, जॅक कॅलिसचा मोडणार महा रेकॉर्ड!

Virat Kohli: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना 12 जुलैपासून डॉमिनिका येथे खेळवला जाणार आहे.
Virat Kohli
Virat KohliDainik Gomantak
Published on
Updated on

IND vs WI, 1st Test: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 12 जुलैपासून सुरु होत आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना 12 जुलैपासून डॉमिनिका येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल.

टीम इंडियाचा (Team India) धडाकेबाज फलंदाज विराट कोहली डोमिनिका येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या या पहिल्या कसोटी सामन्यात इतिहास रचणार आहे. या कसोटी सामन्यात विराट एका मोठ्या विक्रमाला गवसणी घालू शकतो.

सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी यांनाही त्यांच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत हा मोठा विक्रम करता आलेला नाही.

जॅक कॅलिसचा विक्रम मोडीत निघणार

दरम्यान, डॉमिनिका येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) 150 धावा केल्या तर तो दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटपटू जॅक कॅलिसचा विक्रम मोडेल. विराटने 150 धावा केल्यास तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या 25,535 धावा पूर्ण करेल.

या एपिसोडमध्ये, तो दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसच्या पुढे जाईल, ज्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25,534 धावा आहेत. सध्या विराटच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25,385 धावांचा विक्रम आहे.

Virat Kohli
IND vs AUS, 1st Test: टीम इंडियाचा डावाने दणदणीत विजय, अश्विन-जडेजाच्या फिरकीने कांगारुंना गुंडाळलं

कसोटी मालिकेत ही कामगिरी करुन कोहली इतिहास रचणार

दुसरीकडे, विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25, 500 धावांचा टप्पा पार करेल. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ही मोठी कामगिरी करणारा तो सचिन तेंडुलकरनंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरणार आहे.

सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहली हा विक्रम करणारा पहिला फलंदाज ठरणार आहे. कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25,385 धावा केल्या आहेत. तर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 34,357 धावा केल्या आहेत.

तसेच, महेंद्रसिंग धोनी आणि सौरव गांगुली सारखे दिग्गज देखील त्यांच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत हा महान विक्रम करु शकले नाहीत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सौरव गांगुलीने 18,575 आणि महेंद्रसिंग धोनीने 17,266 धावा केल्या आहेत. महेंद्रसिंग धोनी आणि सौरव गांगुली सारख्या दिग्गजांना त्यांच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 25,000 धावाही पूर्ण करता आल्या नाहीत.

Virat Kohli
IND vs AUS, 1st Test: दुसऱ्या दिवशी रोहित-जडेजाची कमाल, तर ऑसींसाठी 5 विकेट्स घेणारा मर्फी स्टार

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

1. सचिन तेंडुलकर (भारत) - 34357 धावा

2. कुमार संगकारा (श्रीलंका) - 28016 धावा

3. रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - 27483 धावा

4. महेला जयवर्धने (श्रीलंका)- 25957 धावा

5. जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) - 25534 धावा

6. विराट कोहली (भारत) - 25385 धावा

Virat Kohli
IND vs BAN, 1st Test: भारताचा बांगलादेशवर दणदणीत विजय, 8 विकेट्ससह कुलदीप ठरला विजयाचा नायक

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके

1. सचिन तेंडुलकर (भारत) - 100 शतके

2. विराट कोहली (भारत) - 75 शतके

3. रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - 71 शतके

4. कुमार संगकारा (श्रीलंका) - 63 शतके

5. जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) - 62 शतके

6. हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका) - 55 शतके

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com