Brian Lara joins West Indies Cricket team as performance mentor: भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ कसोटी, वनडे आणि टी20 मालिका खेळणार आहे. कसोटी मालिकेपासून या दौऱ्यातील सामन्यांना सुरुवात होणार आहे. कसोटी मालिका 12 जुलैपासून सुरू होणार आहे. दरम्यान, यापूर्वी वेस्ट इंडिज क्रिकेटने मोठा निर्णय घेतला आहे.
दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा आता वेस्ट इंडिज संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील झाला आहे. तो भारताविरुद्धच्या मालिकांदरम्यान वेस्ट इंडिज संघाचा परफॉर्मन्स मेंटर म्हणून काम पाहाणार आहे. याबद्दल वेस्ट इंडिजने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.
वेस्ट इंडिजने माहिती दिली की 'वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वीच्या शिबिरात सामील झाला आहे. लारा परफॉर्मन्स मेंटर असेल.'
लारा वेस्ट इंडिजविरुद्ध अनेकवर्षे खेळला आहे. त्याने वनडे आणि कसोटी अशा दोन्ही प्रकारात 10 हजारांहून अधिक धावाही केल्या आहेत. कसोटीत सर्वोच्च 400 धावांची खेळी करण्याचा विक्रमही लाराच्या नावावर आहे. तसेच लाराला प्रशिक्षणाचाही अनुभव आहे. तो आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.
भारताविरुद्ध होणाऱ्या कसोटी, वनडे आणि टी20 मालिका वेस्ट इंडिजसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. कारण नुकतेच वेस्ट इंडिज संघ वर्ल्डकप 2023 स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
वेस्ट इंडिजला वर्ल्डकप 2023 क्वालिफायर स्पर्धेत फारशी चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे त्यांना मुख्य स्पर्धेसाठी पात्रता मिळवता आली नाही. त्यामुळे 48 वर्षांच्या वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिज या स्पर्धेत खेळताना दिसणार नाहीत.
कसोटी चॅम्पियनशीप 2023-25 स्पर्धेला ऍशेस 2023 मालिकेपासून म्हणजेच 16 जूनपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे 12 जुलैपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेतून भारत आणि वेस्ट इंडिज संघही कसोटी चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या पर्वातील आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहेत.
भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध आधी 12 ते 24 जुलै दरम्यान दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल, त्यानंतर 27 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका होईल, तर शेवटी 3 ऑगस्टपासून पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल. 13 ऑगस्ट रोजी या दौऱ्यातील अखेरचा टी20 सामना खेळला जाईल.
कसोटी मालिका (वेस्ट इंडिज विरुद्ध भारत) - वेळ- संध्या. 7.30 वाजता (भारतीय प्रमाणवेळ)
12 - 16 जुलै - पहिला कसोटी सामना, विंडसोर पार्क स्पोर्ट्स स्टेडियम, डॉमिनिका
20 - 24 जुलै - दुसरा कसोटी सामना, क्विंन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद
वनडे मालिका (वेस्ट इंडिज विरुद्ध भारत)- वेळ- संध्या. 7.00 वाजता (भारतीय प्रमाणवेळ)
27 जुलै - पहिला वनडे सामना, केन्सिंगटन ओव्हल, बार्बाडोस
29 जुलै - दुसरा वनडे सामना, केन्सिंगटन ओव्हल, बार्बाडोस
1 ऑगस्ट - तिसरा वनडे सामना, ब्रायन लारा क्रिकेट ऍकेडमी, त्रिनिदाद
टी20 मालिका (वेस्ट इंडिज विरुद्ध भारत) - वेळ- रात्री 8.00 वाजता (भारतीय प्रमाणवेळ)
3 ऑगस्ट - पहिला टी20 सामना, ब्रायन लारा क्रिकेट ऍकेडमी, त्रिनिदाद
6 ऑगस्ट - दुसरा टी20 सामना, नॅशनल स्टेडियम, गयाना
8 ऑगस्ट - तिसरा टी20 सामना, नॅशनल स्टेडियम, गयाना
12 ऑगस्ट - चौथा टी20 सामना, ब्रोवार्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा
13 ऑगस्ट - पाचवा टी20 सामना, ब्रोवार्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.