VIDEO: मैदानातच गुडघ्यावर बसला अन्... संजू सॅमसनचं ते 'स्पेशल' सेलिब्रेशन! विजयानंतरचा भावूक व्हिडिओ व्हायरल

Sanju Samson Celebration Video: वेस्ट इंडीजविरुद्धच्या निर्णायक सामन्यात संजू सॅमसनने केवळ धावांचा पाऊस पाडला नाही, तर कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांची मनेही जिंकली.
Sanju Samson Celebration Video
Sanju Samson Celebration VideoDainik Gomantak
Published on
Updated on

वेस्ट इंडीजविरुद्धच्या निर्णायक सामन्यात संजू सॅमसनने केवळ धावांचा पाऊस पाडला नाही, तर कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांची मनेही जिंकली. आपल्या बॅटने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर संजूने मैदानात जे भावनिक सेलिब्रेशन केले, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मैदानातच गुडघ्यावर बसला संजू

भारताला विजयासाठी शेवटच्या षटकात ७ धावांची गरज होती. संजूने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून भारताला दिमाखात उपांत्य फेरीत पोहचवले. विजय मिळवून देताच संजू भावूक झाला. तो खेळपट्टीवरच गुडघ्यावर बसला, त्याने आपले हेल्मेट काढले आणि बॅट बाजूला ठेवून दोन्ही हात आकाशाच्या दिशेने करून देवाचे आभार मानले. या कठीण काळात स्वतःला सिद्ध केल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्यानंतर शिवम दुबेने त्याला मिठी मारली आणि ड्रेसिंग रूममध्ये परतताना संजूने आपल्या बॅटचे चुंबन घेतले.

Sanju Samson Celebration Video
Goa Crime: रागाच्या भरात पत्नीच्या गळ्यावर केला वार, कर्नाटकातील विवाहितेचा मृत्यू; संशयित पतीला 7 दिवसांची कोठडी

टीकाकारांना चोख प्रत्युत्तर

२०२४ च्या टी-२० विश्वचषकात संजू भारतीय संघाचा भाग होता, मात्र त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. या दौऱ्यातही तो सलामीवीर म्हणून पहिली पसंती नव्हता. मात्र, जेव्हा संधी मिळाली, तेव्हा त्याने १९८ च्या स्ट्राईक रेटने ९७ धावांची नाबाद खेळी करून आपली उपयुक्तता सिद्ध केली. विशेष म्हणजे, त्याने घाईघाईत फटकेबाजी न करता अत्यंत संयतपणे डाव सावरला, ज्यामुळे त्याच्या खेळीत केवळ ४ षटकारांचा समावेश होता.

Sanju Samson Celebration Video
Goa Accident: शिवोली पुलावर भीषण अपघात; कार आणि कदंब बसची समोरासमोर धडक, वाहतुकीचा मोठा खोळंबा

उपांत्य फेरीचा मार्ग सुकर

वेस्ट इंडीजसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध दबावाच्या परिस्थितीत संजूने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ती ऐतिहासिक ठरली. सुरुवातीला संथ वाटणारी त्याची खेळी नंतर वादळी ठरली. रोमारियो शेफर्डच्या गोलंदाजीवर त्याने ज्या आत्मविश्वासाने विजय मिळवून दिला, त्याने भारतीय गोटात आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे. संजूच्या या खेळीमुळे आता आगामी मोठ्या सामन्यांसाठी सलामीच्या जोडीबाबत संघ व्यवस्थापनासमोर सुखाद पेच निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com