KL Rahul and Shreyas Iyer Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2023: आशिया चषकापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका, 2 प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत रोहित सेना मैदानात!

KL Rahul and Shreyas Iyer: केएल राहुल आणि श्रेयस अय्यर दुखापतीतून बरे झाले असून दोघेही आशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहेत. मात्र चाहत्यांची निराशा झाली.

Manish Jadhav

KL Rahul and Shreyas Iyer: आशिया चषकापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. वास्तविक, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर आशिया कपमध्ये टीम इंडियाचा भाग नसतील.

असे मानले जात होते की, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर दुखापतीतून बरे झाले असून दोघेही आशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहेत. मात्र चाहत्यांची निराशा झाली.

चाहत्यांची घोर निराशा

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये केएल राहुल फलंदाजी आणि विकेटकीपिंगचा सराव करताना दिसला होता. यानंतर चाहत्यांना आशा होती की, केएल राहुल (KL Rahul) आशिया कपमध्ये खेळताना दिसेल. मात्र पुन्हा एकदा चाहत्यांची घोर निराशा झाली.

खरे तर, केएल राहुल बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. आयपीएल 2023 च्या मोसमात राहुल दुखापतीचा बळी ठरला होता. त्याचबरोबर, केएल राहुलशिवाय श्रेयस अय्यरही आशिया कपमध्ये खेळू शकणार नाही.

विश्वचषकापर्यंत केएल राहुल आणि श्रेयस अय्यर फिट होतील का?

केएल राहुल आणि श्रेयस अय्यरच्या पुनरागमनानंतर मीडिल ऑर्डरचा प्रश्न सुटू शकेल, असे मानले जात होते. पण आता प्रश्न आहे की केएल राहुल आणि श्रेयस अय्यर विश्वचषकापर्यंत फिट होतील का?

राहुल आणि श्रेयस विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त होऊ शकले नाहीत, तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी तो मोठा धक्का ठरु शकतो. सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे.

टीम इंडियाने (Team India) कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा पराभव केला. आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 टी-20 मालिकेतील पहिला सामना गुरुवारी होणार आहे.

बीसीसीआयने फिटनेस अपडेट दिले होते

सुमारे दोन आठवड्यांपूर्वी (21 जुलै) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्यांच्या काही खेळाडूंबाबत वैद्यकीय अपडेट जारी केले होते.

यामध्ये केएल राहुल आणि श्रेयसचीही माहिती देण्यात आली आहे. मंडळाने सांगितले होते की, दोन्ही फलंदाजांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये सराव सुरु केला आहे.

केवळ बीसीसीआयच नाही तर श्रेयस आणि राहुल यांनीही अलीकडच्या काळात इंस्टाग्रामवर त्यांच्या फिटनेस ड्रिल आणि फलंदाजीच्या सरावाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते.

राहुलने बुधवार, (2 ऑगस्ट) रोजीच एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो फलंदाजीव्यतिरिक्त कीपिंग करतानाही दिसत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lok Sabha in Konkani: वाल्लोर! लोकसभेचं कामकाज कोकणीत होणार; इतिहासात पहिल्यांदाच संसदेत 'गोव्याचा' आवाज दुमदुमणार

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

Goa Crime: 'इन्स्टा'वरून युवतींची फसवणूक, 5 अजामीन वॉरंट, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा; अट्टल गुन्हेगाराची कोठडीत रवानगी

Goa Online Scam: सिंगापूरातून दिल्लीत उतरला, विमानतळावरच भामट्याला अटक; शिवोलीतील महिलेला घातला होता 1 कोटींचा गंडा

Goa Live News: क्रूझ पर्यटनातून मुरगाव बंदर 4.8 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवते

SCROLL FOR NEXT