Asia Cup 2023: वर्ल्डकपपूर्वीच 2 आठवड्यात भारत - पाकिस्तान तीनदा येऊ शकतात आमने-सामने; द्रविड म्हणतोय...

India vs Pakistan: आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान संघ तीन वेळा आमने-सामने येऊ शकतात, पण कसे आणि कधी, जाणून घ्या सर्वकाही.
India vs Pakistan | Asia Cup 2023
India vs Pakistan | Asia Cup 2023Dainik Gomantak

Asia Cup 2023, India vs Pakistan matches: आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) बुधवारी आशिया चषक 2023 स्पर्धेचे वेळापत्रक घोषित केले आहे. या 16 व्या आशिया चषक स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, या स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान संघात दोन आठवड्यात तीन सामने होण्याची शक्यता आहे.

या स्पर्धेसाठी पहिल्या फेरीत सहा संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. ए ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान आणि नेपाळ संघांचा समावेश आहे, तर बी ग्रुपमध्ये गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे.

पहिल्या फेरीनंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर फोर फेरीत प्रवेश करतील. सुपर फोर फेरीत देखील चार संघात साखळी पद्धतीने सामने खेळवले जातील, यातून गुणतालिकेतील अव्वल दोन संघ 17 सप्टेंबर दरम्यान अंतिम सामना खेळणार आहेत.

India vs Pakistan | Asia Cup 2023
'फक्त टॅलेंट असून...', वेस्ट इंडिज World Cup 2023 मधून बाहेर गेल्यानंतर सेहवाग बरसला

या स्पर्धेचा फॉरमॅट पाहाता भारत आणि पाकिस्तान संघ तीन वेळा आमने-सामने येऊ शकतात. दोन्ही संघांचा पहिल्या फेरीसाठी एकाच गटात समावेश असल्याने या फेरीत 2 सप्टेंबर रोजी कँडी येथे या दोन्ही संघात सामना होणार आहे.

तसेच 10 सप्टेंबर रोजी ए ग्रुपमधून सुपर फोरमध्ये प्रवेश केलेल्या दोन संघात कोलंबो येथे सामना खेळवला जाणार आहे, त्यामुळे जर भारत आणि पाकिस्तान संघांनी सुपर फोर फेरीत प्रवेश केला, तर 10 सप्टेंबर रोजी या दोन्ही संघात या स्पर्धेतील दुसरा सामना होईल.

याशिवाय जर सुपर फोरच्या फेरीत हे दोन्ही संघ गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावर राहिले, तर पुन्हा एकदा कोलंबोमध्ये 17 सप्टेंबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळताना दिसतील.

द्रविडची आली प्रतिक्रिया

दरम्यान, आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचीही प्रतिक्रिया आली आहे. त्याने भारत आणि पाकिस्तानमधील संभाव्य तीन सामन्यांबद्दल आपले मत मांडले आहे.

द्रविड म्हणाला, 'वेळापत्रकाची घोषणा झाली आहे. तुम्हाला पाकिस्तानविरुद्ध तीनवेळा खेळण्यासाठी आधी सुपर फोरसाठी पात्र ठरावे लागणार आहे. एकावेळी एक पाऊल पुढे ठेवावे लागेल.'

'मला माहित आहे पहिले दोन सामने पाकिस्तान आणि नेपाळविरुद्ध खेळायचे आहेत. त्यामुळे आम्हाला आधी त्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. आम्हाला ते सामने आधी जिंकणे गरजेचे आहे आणि हे देखील पाहावे लागेल की स्पर्धा कशी पुढे जात आहे.'

'जर आम्हाला पाकिस्तानविरुद्ध तीनदा खेळण्याची संधी मिळणार असेल, तर ते शानदार असेल. त्यामुळे याचा अर्थ असा आहे की आम्ही स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचू शकू आणि आशा आहे की पाकिस्तानही अंतिम सामन्यात पोहोचेल.'

India vs Pakistan | Asia Cup 2023
Asia Cup 2023 Schedule: शिक्कामोर्तब! आशिया चषकाच्या वेळापत्रकाची घोषणा, पाहा कधी आणि कुठे होणार भारताचे सामने

त्याचबरोबर द्रविड म्हणाला, 'ही शानदार स्पर्धा आहे आणि आम्ही नक्कीच अंतिम सामन्यात खेळण्यासाठी आणि जिंकण्यासाठी प्रयत्न करू. पण आम्हाला असे करण्यासाठी पहिले दोन पाऊले उचलावी लागतील.

वर्ल्डकपमध्येही येणार आमने-सामने

क्रिकेट चाहत्यांसाठी यंदा भारत आणि पाकिस्तान संघात किमान दोन सामने तरी पाहायला मिळणारच आहेत. कारण आशिया चषकानंतर भारतात 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्डकप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान सामना होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com