Kagiso Rabada | Rohit Sharma AFP
क्रीडा

Rohit Sharma: रोहितला रबाडा झेपेना! कर्णधाराला आवडत्या पुल शॉटवरच आऊट करून बनला सर्वात यशस्वी बॉलर

Pranali Kodre

South Africa vs India, 1st Test Match at Centurion, Rohit Sharma vs Kagiso Rabada:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात मंगळवारपासून दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (26 डिसेंबर) सुरु झाला आहे. सेंच्युरियनला होत असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने भारतीय फलंदाजांना चांगलेच सतावले आहे.

या सामन्यात रबाडाने 5 विकेट्सही घेतल्या, ज्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माचाही समावेश आहे. त्यामुळे रबाडा रोहित शर्माविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी गोलंदाजही ठरला आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बाऊमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताकडून पहिल्या डावात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल सलामीला फलंदाजीला उतरले.

मात्र, पाचव्याच षटकात रबाडाने टाकलेल्या आखुड टप्प्याच्या चेंडूवर रोहितने त्याचा आवडता पुलचा फटका मारला, पण स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या नांद्रे बर्गरने त्याचा झेल घेतला. त्यामुळे रोहितला ५ धावांवर माघारी परतावे लागले.

दरम्यान, रबाडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितला बाद करण्याची ही 28 सामन्यांमधील 13 वी वेळ होती. त्यामुळे रबाडा रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने याबाबत न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊदीला मागे टाकले आहे. साऊदीने रोहितला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 32 सामन्यांमध्ये 12 वेळा बाद केले आहे.

तसेच रबाडाने रोहितला कसोटीत 7 सामन्यांमध्ये 6 वेळा बाद केले आहे. त्यामुळे तो कसोटीत नॅथन लायननंतर रोहितला सर्वाधिकवेळा बाद करणारा गोलंदाज आहे. लायनने 9 वेळा कसोटीत रोहितला बाद केले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितला सर्वाधिकवेळा बाद करणारे गोलंदाज (26 डिसेंबर 2023 पर्यंत)

  • 13 - कागिसो रबाडा

  • 12 - टीम साऊदी

  • 10 - अँजेलो मॅथ्यूज

  • 9 - नॅथन लायन

  • 8 - ट्रेंट बोल्ट

रबाडाच्या पाच विकेट्स

या सामन्यात पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत भारताने 50 षटकात 7 बाद 176 धावा केल्या. रबाडाने रोहितनंतर विराट कोहली (38), श्रेयस अय्यर (31), आर अश्विन (8) आणि शार्दुल ठाकूर (24) यांना बाद केले. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पहिल्यांदाच 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT