SA vs IND: बॉक्सिंग डे टेस्ट रोहित-विराटसाठी ठरणार विक्रमी? धोनी, द्रविड, सेहवागचे मोडू शकतात 'हे' विक्रम

Virat Kohli - Rohit Sharma: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीत रोहित शर्माकडे धोनीला मागे टाकण्याची, तर विराट कोहलीकडे द्रविड, सेहवागला पछाडण्याची सुवर्णसंधी आहे.
Rohit Sharma | Virat Kohli
Rohit Sharma | Virat KohliDainik Gomantak

South Africa vs India Test Series 2023-24, Rohit Sharma, Virat Kohli Records:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका मंगळवारपासून (26 डिसेंबर) चालू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बॉक्सिंग डे कसोटी असेल. हा सामना सेंच्युरियनला खेळला जाणार आहे.

या सामन्यादरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना मोठे विक्रम करण्याची संधी आहे.

रोहित टाकू शकतो धोनीला मागे

रोहितने या सामन्यात दोन षटकार मारले, तर तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत माजी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकू शकतो.

Rohit Sharma | Virat Kohli
IND vs SA: प्लेइंग-11, गोलंदाजी अन् केएल राहुलचे यष्टीरक्षण; कसोटी मालिकेपूर्वी रोहितने मांडले 5 महत्त्वाचे मुद्दे

सध्या रोहितच्या नावावर 52 कसोटी सामन्यांमध्ये 77 षटकारांची नोंद आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत धोनीपाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या धोनीने 90 कसोटी सामन्यांमध्ये 78 षटकार मारले आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर असलेल्या विरेंद्र सेहवागने 104 कसोटी सामन्यांमध्ये 91 षटकार मारले आहेत.

विराट टाकू शकतो द्रविड-सेहवागला मागे

विराट कोहलीलाही या सामन्यादरम्यान मोठा विक्रम करण्याची संधी असणार आहे. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत राहुल द्रविड आणि विरेंद्र सेहवागला मागे टाकू शकतो. द्रविडला मागे टाकण्यासाठी विराटला 17 धावांची गरज आहे, तर सेहवागला मागे टाकण्यासाठी 71 धावांची गरज आहे.

Rohit Sharma | Virat Kohli
SA vs IND: पहिल्याच कसोटीत पावसाचा खेळ? कसे असेल सेंच्युरियनमधील हवामान अन् खेळपट्टी, वाचा

सध्या विराटने कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 14 सामन्यांमध्ये 56.18 च्या सरासरीने आणि 3 शतके व 4 अर्धशतकांसह 1236 धावा केल्या आहेत. तो सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या द्रविडने 21 कसोटी सामन्यांमध्ये 33.83 च्या सरासरीने 1252 धावा केल्या आहेत. तसेच दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या विरेंद्र सहेवागने 15 सामन्यांमध्ये 50.23 च्या सरासरीने 1306 धावा केल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे. त्याने 25 कसोटी सामन्यांमध्ये 42.46 च्या सरासरीने 1741 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com