Jasprit Bumrah Dainik Gomantak
क्रीडा

Jasprit Bumrah Record: कॅप्टन बुमराहचा कमबॅकमध्येच जलवा! आजपर्यंत कोणालाच न जमलेला विक्रम केला नावावर

IRE vs IND, 1st T20: जसप्रीत बुमराहने आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यातून पुनरागमन करताना मोठा विक्रमही नोंदवला.

Pranali Kodre

Jasprit Bumrah became first Indian to win Man of the Match award in T20I captaincy debut:

आयर्लंड विरुद्ध भारत संघात 3 सामन्यांची टी20 मालिका शुक्रवारपासून सुरू झाली आहे. या मालिकेतील डब्लिनला झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार 2 धावांनी विजय मिळवला.

भारताच्या या विजयात कर्णधार जसप्रीत बुमराहचेही मोठे योगदान राहिले. विशेष गोष्ट अशी की बुमराहने 10 महिन्यांनंतर भारतीय संघात या सामन्यातून पदार्पण कले होते.

तसेच केवळ त्याने या सामन्यातून पुनरागमनच केले नाही, तर भारतीय संघाचे नेतृत्वही केले. अनेक वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत त्याच्याकडे या टी20 मालिकेसाठी कर्णधारपदाची धूरा सोपवण्यात आली आहे.

त्यामुळे बुमराहच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. बुमराहने या सामन्यात सर्वोत्तम खेळाडूचा म्हणजेच सामनावीराचा पुरस्कार जिंकला. यामुळे तो कर्णधार म्हणून पहिल्याच आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात खेळताना सामनावीर पुरस्कार जिंकणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.

बुमराहचे शानदार पुनरागमन

बुमराहच्या दुखापतग्रस्त पाठीवर काही महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे त्याला बराच काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागले. पण यानंतर त्याने 10 महिन्यांनी भारतीय संघाकडून पुनरागमन केले.

त्याने पुनरागमन करताना आयर्लंडविरुद्ध पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेतल्या. त्याने या सामन्यात 4 षटके गोलंदाजी करताना 24 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्याच्या याच कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय गोलंदाजांनी आयर्लंडला 20 षटकात 7 बाद 139 धावांपर्यंत रोखण्यात यश मिळवले. दरम्यान, आयर्लंकडून बॅरी मॅककार्थीने चांगली झुंज दिली. त्याने 33 चेंडूत 51 धावांची नाबाद खेळी केली. तसेच त्याला 39 धावा करणाऱ्या कर्टिस कॅम्फरने चांगली साथ दिली.

भारताकडून जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच अर्शदीप सिंगने 1 विकेट घेतली.

त्यानंतर 140 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाज यांनी 46 धावांची सलामी भागीदारी रचली. पण जयस्वालला 7 व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर क्रेग यंगने 24 धावांवर बाद केले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर क्रेगने तिलक वर्माला शुन्यावर बाद करत माघारी पाठवले.

यानंतर 6.5 षटकांपर्यंत खेळ झालेला असतानाच पावसाला सुरुवात झाल्याने सामना थांबला. यावेळी ऋतुराज 19 धावांवर आणि संजू सॅमसन 1 धावेवर नाबाद होते. यानंतर सामना पुन्हा सुरू झाला नाही आणि त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला विजयी घोषित करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत केली मारहाण; सत्तरीतील 19 वर्षीय संशयित तरुणाला अटक

Goa Cyber Crime: पणजीतील ज्येष्ठ नागरिकाला 4.74 कोटींचा गंडा! बनावट गुंतवणूक घोटाळ्याच्या मुख्य आरोपीला कोल्हापुरातून अटक; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

Goa Weather Update: गोव्यात विजांच्या कडकडाटासह बरसणार मुसळधार सरी, आयएमडीने जारी केला 'नाऊकास्ट' इशारा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

PM मोदींच्या दौऱ्यासाठी काणकोणमध्ये 3 हेलिपॅड सज्ज! 77 फूट उंच श्रीरामांच्या मूर्तीचे करणार अनावरण

26 नोव्हेंबरला दुर्मिळ 'लक्ष्मी नारायण योग'! 'या' 4 राशींच्या लोकांवर होणार धन वर्षा, करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचा योग; उत्पन्नाचे स्रोत वाढणार

SCROLL FOR NEXT