Jasprit Bumrah Video: बुमराहने गाजवलं कमबॅक! पहिल्याच ओव्हरमध्ये आयर्लंडला दोन झटके देत नोंदवला विक्रम

Jasprit Bumrah Comeback Video: जसप्रीत बुमराहने 10 महिन्यांनी पुनरागमन करत पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेतल्या आहेत.
Jasprit Bumrah
Jasprit BumrahDainik Gomantak
Published on
Updated on

Jasprit Bumrah two Wickets in 1st Over:

आयर्लंड विरुद्ध भारत यांच्यात 3 सामन्यांची टी20 मालिका शुक्रवारपासून सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना मलाहाईड, डब्लिन येथे होत आहे. याच मालिकेतून भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहचे तब्बल 10 महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.

विशेष म्हणजे बुमराह फक्त गोलंदाज म्हणूनच नाही, तर कर्णधार म्हणून या मालिकेत खेळत आहे. दरम्यान बुमराहचे वर्चस्व त्याच्या पुनरागमनाच्या पहिल्याच सामन्यातील पहिल्याच षटकात दिसले आहे.

या सामन्यात कर्णधार बुमराहनेच नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पहिल्याच षटकात बुमराहने गोलंदाजी करण्यासाठी चेंडू हातात घेतला. त्याच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर अँड्र्यू बालबर्नीने चौकार मारत सुरुवात केली होती. पण दुसऱ्याच चेंडूवर त्याला बुमराहने त्रिफळाचीत केले.

Jasprit Bumrah
Jasprit Bumrah: 'मी त्याचा फॅन, पण बॉलिंग ऍक्शन...' बुमराहला दिग्गज मॅकग्राचा पुनरागमनापूर्वी मोलाचा सल्ला

त्यानंतर लोर्कन टकर फलंदाजीला आला. त्याला तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर धाव करता आली नाही. मात्र, पाचव्या चेंडूवर त्याने फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या बॅटला लागून चेंडू यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या हातात गेला. त्यामुळे टकर शुन्यावर बाद झाला. त्यामुळे बुमराहला पहिल्याच षटकात दोन विकेट्स मिळाल्या.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेणारा बुमराह चौथा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी आर अश्विन, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पंड्या यांनी असा कारनामा केला आहे.

Jasprit Bumrah
Jasprit Bumrah: पुनरागमनासाठी कॅप्टन बुमराह आतुर! नेटमध्ये करतोय बाउंसर, यॉर्करचा मारा, पाहा Video

अश्विनने विशाखापट्टणमला 2016 साली श्रीलंकेविरुद्धच्या टी20 सामन्यात पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेतल्या होत्या, तसेच भुवनेश्वरने दुबईमध्ये 2022 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध आणि हार्दिकने काही दिवसांपूर्वी गयानाला झालेल्या टी20 सामन्यामध्ये पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेतल्या होत्या.

बुमराहवर झाली आहे शस्त्रक्रिया

बुमराहला गेल्यावर्षी पाठीच्या दुखापतीचा मोठ्या प्रमाणात त्रास झाला होता. ज्यामुळे त्याला एप्रिल 2023 मध्ये शस्त्रक्रियाही करून घ्यावी लागली. याचमुळे बुमराह टी20 वर्ल्डकप 2023 स्पर्धा, तसेच आयपीएल 2023 स्पर्धेलाही मुकला, त्याचबरोबर कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही त्याला खेळता आले नाही.

त्याने यापूर्वी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 25 सप्टेंबर 2022 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेत खेळला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com