Jasprit Bumrah Advice: रिंकू अन् प्रसिद्ध कृष्णाला पदार्पणापूर्वी कर्णधार बुमराहचा एका वाक्यात सल्ला, म्हणाला...

IRE vs IND, 1st T20I: आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातून पदार्पण करणाऱ्या रिंकू अन् प्रसिद्ध कृष्णाला काय सल्ला दिला, याबद्दल बुमराहनेच खुलासा केला आहे.
Jasprit Bumrah and Rinku Singh
Jasprit Bumrah and Rinku SinghDainik Gomantak
Published on
Updated on

Jasprit Bumrah advice to T20I debutants Rinku Singh & Prasidh Krishna:

आयर्लंड विरुद्ध भारत यांच्यात 3 सामन्यांची टी20 मालिका शुक्रवारपासून सुरू झाली असून पहिला सामना मलाहाईड, डब्लिन येथे होत आहे. या सामन्यात भारताकडून दोन खेळाडूंचे पदार्पण झाले आहे.

या सामन्यातून भारताकडून अष्टपैलू रिंकू सिंग आणि वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा या दोन खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण झाले आहे. या दोघांनाही कर्णधार जसप्रीत बुमराहने पदार्पणाची कॅप दिली.

दरम्यान, नाणेफेकीवेळी बुमराहने या दोघांना दिलेल्या सल्ल्याबद्दल सांगितले. बुमराहने त्यांना एका वाक्यातच सल्ला दिल्याचे सांगितले.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतल्यानंतर बुमराह म्हणाला, 'आमच्याकडून रिंकू आणि प्रसिद्ध कृष्णा या दोघांचे पदार्पण होत आहे. त्यांना मी फक्त इतकेच सांगितले की स्वत:च्या क्रिकेटची मजा घ्या.'

Jasprit Bumrah and Rinku Singh
Jasprit Bumrah Video: बुमराहने गाजवलं कमबॅक! पहिल्याच ओव्हरमध्ये आयर्लंडला दोन झटके देत नोंदवला विक्रम

रिंकू-प्रसिद्धचे पदार्पण

रिंकूचे हे आंतरराष्ट्रीय पदार्पणही ठरले आहे. तो भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा भारताचा 397 वा खेळाडू ठरला आहे. प्रसिद्ध कृष्णाने यापूर्वी भारताकडून 14 वनडे सामने खेळले आहेत.

तसेच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा प्रसिद्ध कृष्णा भारताचा 106 वा खेळाडू आणि रिंकू सिंग 107 वा खेळाडू ठरला आहे. या दोघांनाही पदार्पणाची कॅप जसप्रीत बुमराहने दिली.

रिंकूने यंदाच्या आयपीएलमध्ये प्रभावित केले होते. त्याचेच बक्षीस त्याला मिळाले असून त्याने भारताकडून पदार्पण केले आहे. रिंकूने आयपीएल 2023 स्पर्धेत 14 सामन्यांमध्ये 59.25 च्या सरासरीने 474 धावा केल्या होत्या.

Jasprit Bumrah and Rinku Singh
Rinku Singh: बेताची परिस्थिती, डोक्यावर कर्ज, BCCI कडून निलंबन... पण संकटांवर मात करत मिळवली नवी ओळख

तसेच रिंकूने त्याच्या कारकिर्दीत टी२० क्रिकेटमध्ये 89 सामने खेळताना १० अर्शतकांसह 1768 धावा केल्या आहेत.

त्याबरोबर २०२१ मध्ये भारताकडून वनडे पदार्पण केलेल्या प्रसिद्ध कृष्णाने १४ वनडे सामने खेळताना २५ विकेट्स घेतल्या आहेत. पण तो गेल्या काही महिन्यात दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होता. पण आता तो पूर्ण सावरला असून त्याचे क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले आहे. त्याने त्याच्या टी२० कारकिर्दीत ७२ सामने खेळले असून ६८ विकेट्स घेतल्या आहेत.

बुमराहचेही पुनरागमन

आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यातून बुमराहनेही 10 महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्याचा दुखापतग्रस्त पाठीवर काही महिन्यांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे त्याला बराच काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. पण आता त्याचेही पुनरागमन झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com