FC Goa Team Dainik Gomantak
क्रीडा

ISL Football: एफसी गोवासाठी उद्याचा सामना 'करो या मरो'

तळाच्या, पण धोकादायक नॉर्थईस्टविरुद्ध होणार सामना

ISL Football: नॉर्थईस्ट युनायटेड सध्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत तळात शेवटच्या क्रमांकावर असला, तरी गुवाहाटीतील संघ धोकादायक आहे. एफसी गोवाला रविवारी (ता. 15) सावधच राहावे लागेल. स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीच्या दृष्टीने त्यांच्यासाठी सामना खूपच महत्त्वाचा ठरेल, कदाचित हाच सामना त्यांचे भवितव्य निश्चित करू शकतो.

एफसी गोवा व नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यातील सामना रविवारी गुवाहाटी येथे खेळला जाईल. एफसी गोवाचे सध्या 13 लढतीतून 19 गुण असून ते सहाव्या स्थानी आहेत. शनिवारी बंगळूर एफसीने ओडिशा एफसीला हरविले, त्यामुळे एफसी गोवाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यांनी नॉर्थईस्टला नमविल्यास गुणतक्त्यात त्यांचे व ओडिशाचे समान 22 गुण होतील. नॉर्थईस्ट युनायटेडसाठी गमावण्यासारखे काहीच नाहीच. त्यांनी 13 पैकी 12 सामने गमावले आहेत, मात्र व्हिन्सेन्झो अन्नेज याने प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गुवाहाटीतील संघाने एटीके मोहन बागानला हरविले, तर मागील लढतीत बंगळूरला झुंजविले, मात्र त्यांना 1-2 असा निसटता पराभव पत्करावा लागला, त्यामुळे एफसी गोवास निश्चिंत राहता येणार नाही.

अतिशय महत्त्वाचा सामना पेनया

नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्धचा सामना अतिशय महत्त्वाचा आहे ही बाब एफसी गोवाचे प्रशिक्षक कार्लोस पेनया यांनाही मान्य आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला त्यांनी सांगितले, की ‘‘मोसमातील बाकी प्रत्येक लढत आमच्यासाठी अंतिम सामन्याप्रमाणे आहे. आम्हाला पहिल्या सहा संघात स्थान टिकविण्यासाठी प्रत्येक लढतीत विजय मिळवावा लागेल. आम्ही निश्चितच तीन गुणांसाठी प्रयत्न करू. नव्या प्रशिक्षकाचे आगमन झाल्यापासून त्यांनी (नॉर्थईस्ट युनायटेड) प्रगती साधली आहे. त्यांनी नव्या खेळाडूंना करारबद्ध केले. मोसमाच्या सुरवातीच्या तुलनेत ते आता चांगला खेळ करत आहेत. एटीके मोहन बागानविरुद्ध इतर संघांना संघर्ष करावा लागला, मात्र नॉर्थईस्टने त्यांना नमविले. साहजिकच आमच्यासाठी उद्याचा सामना खडतरच असेल.’’

मैदानात उतरण्यापूर्वी...

- आयएसएल स्पर्धेत नॉर्थईस्टविरुद्ध एफसी गोवाच्या एकूण 17 लढती

- एफसी गोवाचे 6, नॉर्थईस्टचे 3 विजय, 8 बरोबरी

- पहिल्या टप्प्यात 17 डिसेंबर 2022 रोजी फातोर्ड्यात एफसी गोवा 2-1 फरकाने विजयी

- मागील 3 लढतीत एफसी गोवाचे 2 पराभव, 1 बरोबरी

- नॉर्थईस्ट युनायटेडचे यापूर्वीच्या 3 लढतीत 1 विजय 2 पराभव

- यंदा स्पर्धेत एफसी गोवाचे 21, तर नॉर्थईस्ट युनायटेडचे 11 गोल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT