Goa
Goa Dainik Gomantak

Mormugao Crime : धक्कादायक ! 24 वर्षीय युवकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

मुरगाव तालुक्यातील संशयित युवकास अटक
Published on

Mormugao Crime : मुरगाव येथील 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. त्यामूळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुन्हेगारी घटनांमध्ये इतर राज्यातील नागरीकांचा सहभाग सर्वाधिक असल्याचे म्हटले होते. याचा प्रत्यय पुन्हा आला आहे.

Goa
New Convention Centre in Goa : गोव्यात लवकरच पंचतारांकित हॉटेलसह कन्व्हेन्शन सेंटरची होणार उभारणी

मिळालेल्या माहितीनुसार, मुरगाव येथील 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात संशयित आरोपी राहुल बिरादार (वय 24) याला अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपी हा मुरगाव तालुक्यातीलच रहिवासी आहे.

Goa
Goa Suicide News : कसिनोत काम करणाऱ्या मुलीची राहत्या घरात आत्महत्या; कारण अस्पष्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पीडितेकडून नोंदवलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरु केला आहे. तक्रारीच्या पार्श्वभूमीवर सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

अशातच आज सकाळी गोव्यातील कसिनोमध्ये काम करणाऱ्या एका नेपाळी मुलीने राहत असलेल्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पणजीतील सांतीनेज परिसरातील सिद्धीविनायक मंदिराजवळ असलेल्या अपार्टमेंटमध्ये तिघीजणी राहत होत्या. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून ते पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com