IPL 2026 Points Table Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2026 Points Table: पंजाबचा विजयाचा रथ रुतला, हाय-स्कोअरिंग सामन्यात दिल्लीनं मारली बाजी; गुणतालिकेत मोठा उलटफेर

IPL Playoff Scenarios: दिल्ली कॅपिटल्सने आपला झुंजार खेळ सुरु ठेवत एका महत्त्वाच्या विजयासह गुणतालिकेत मोठी झेप घेतली.

Manish Jadhav

IPL 2026 Points Table News: आयपीएलचा चालू हंगाम आता एका अत्यंत रोमांचक वळणावर येऊन पोहोचला. ज्या पंजाब किंग्सने सुरुवातीला विजयाचा धडाका लावला होता, त्यांच्या विजयाचा रथ आता पूर्णपणे रोखला गेला आहे. जे अजिंक्य मानले जात होते, त्यांना आता सलग पराभवांचा सामना करावा लागत असून प्लेऑफमध्ये ते स्थान मिळवू शकतील की नाही, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने आपला झुंजार खेळ सुरु ठेवत एका महत्त्वाच्या विजयासह गुणतालिकेत मोठी झेप घेतली. एकूणच पहिल्या चार क्रमांकाचा (टॉप 4) पेच आता अधिकच गुंतागुंतीचा झाला असून येणाऱ्या दिवसात कोणते संघ बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत दिल्लीने पंजाबचा 3 गड्यांनी पराभव केला. हा एक हाय-स्कोअरिंग सामना होता, ज्यामध्ये दिल्लीने एक षटक राखूनच विजय मिळवला. या विजयामुळे दिल्ली कॅपिटल्सने गुणतालिकेत एका स्थानाने झेप घेतली. यापूर्वी 8 गुणांसह आठव्या क्रमांकावर असलेल्या दिल्लीचे आता 12 सामन्यांनंतर 10 गुण झाले असून त्यांनी सातव्या क्रमांकावर झेप घेतली. दिल्लीसाठी प्लेऑफचे दरवाजे अजूनही उघडे असले, तरी येथून झालेला एकही पराभव त्यांना स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी पुरेसा ठरेल. या विजयामुळे आता गुणतालिका अधिकच रंजक झाली.

पंजाब किंग्सचा विचार केला, तर ते अजूनही पहिल्या चारमध्ये टिकून असले, तरी सलग चार पराभवांनी त्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) 14 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्सचेही प्रत्येकी 14 गुण आहेत, परंतु त्यांचा नेट रन रेट बंगळुरुच्या तुलनेत कमी आहे. पंजाबकडे सध्या 13 गुण असून ते चौथ्या क्रमांकावर आहेत. मात्र, त्यांच्या सलग पराभवांमुळे इतर संघांना वर येण्याची मोठी संधी मिळाली.

गुणतालिकेत सध्या चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्सचे (Rajasthan Royal) प्रत्येकी 12 गुण आहेत. याचाच अर्थ असा की, या दोन संघांपैकी कोणत्याही संघाने आपला पुढचा सामना जिंकला, तर त्यांच्याकडे पंजाबला मागे टाकून पहिल्या चारमध्ये स्थान मिळवण्याची सुवर्णसंधी असेल. यामुळे पंजाबला गुणतालिकेत खाली जावे लागेल. येत्या काळात गुणतालिकेत वर जाण्यासाठी संघांमध्ये जबरदस्त संघर्ष पाहायला मिळणार आहे.

आजच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज चुरस पाहायला मिळेल. दोन्ही संघांकडे प्रत्येकी 14 गुण आहेत. आज जो संघ जिंकेल, तो थेट अव्वल स्थानावर पोहोचेल, म्हणजेच बंगळुरुचे पहिले स्थान आज हिरावले जाणार हे निश्चित आहे. इतकेच नाही, तर आजचा विजेता संघ प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास निश्चित करेल. आता या विजयावर आजच शिक्कामोर्तब होते की चाहत्यांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: ODI World Cup 2027 मध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा भिडणार? 'ICC' च्या नव्या फॉरमॅटने वाढवली उत्सुकता

Goa Weather Update: मुसळधार पावसानंतर राज्यात दिलासादायक चित्र; पावसाचा जोर ओसरला, शेतकरी हवालदील

Noida Fire: नोएडातील पाच मजली इमारतीला भीषण आग; दोन जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू

Rohit Sharma Viral Video: रोहित शर्माचा आक्रमक अवतार? भर मैदानात 'या' खेळाडूला मारली लाथ, कॅमेऱ्यामागे नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: HRA मध्ये अपेक्षेपेक्षा मोठी वाढ होण्याची शक्यता; फिटमेंट फॅक्टर ठरणार निर्णायक, पाहा संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT